AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारचा दिलासा : डाळीचे दर राहणार मर्यादीत, सणाच्या तोंडावर मोठा निर्णय

देशात तेलबियांचे (India) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. असे असूनही भारताला परदेशातून दाळींची आयात करावी लागत आहे. त्यामुळे डाळीच्यासाठ्यावर आता सरकारची करडी नजर राहणार आहे. साठवणुकीबाबत राज्य (State Government) सरकारला योग्य ती माहिती वेळेत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारचा दिलासा : डाळीचे दर राहणार मर्यादीत, सणाच्या तोंडावर मोठा निर्णय
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 21, 2021 | 8:59 AM
Share

मुंबई : देशात तेलबियांचे (India) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. असे असूनही भारताला परदेशातून दाळींची आयात करावी लागत आहे. त्यामुळे डाळीच्यासाठ्यावर आता सरकारची करडी नजर राहणार आहे. साठवणुकीबाबत राज्य (State Government) सरकारला योग्य ती माहिती वेळेत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ऐन सणासुदीत डाळीचे दर हे वाढणार नाहीत. याबाबत 17 देशातील 217 व्यापाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

देशाच डाळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, व्यापाऱ्यांकडे असलेल्या डाळींच्या साठवणुकीचे नियोजन नसल्याने दर वाढतात. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना अधिकच्या दराने डाळींची खरेदी करावी लागत आहे. देशातील वार्षिक उत्पन्न पाहिले असता सन 2019-20 मध्ये तूर दाळ 38.90 मेट्रीक टन, उडीद डाळ 20.80 मेट्रीक टन, मसूर डाळ 11 मेट्रीक टन, मूग डाळ 25.10 मेट्रीक टन आणि चना डाळ 118 मेट्रीक टन होती. असे असतानाच त्याच वर्षी तूर, उडीद, मसूर, मूग आणि चना डाळी इतर देशांमधून अनुक्रमे 4.50 मेट्रीक टन, 3.12 मेट्रीक टन, 8.54 मेट्रीक टन, 0.69 मेट्रीक टन आणि 3.71 मेट्रीक टन आयात कराव्या लागल्या आहेत.

 तर आता सणासुदीच्या कालावधीत डाळींचे दर वाढणार नाहीत !

डाळींच्या किमता मर्यादीत ठेवण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करीत आहे. याबाबत सर्व राज्यांना पत्रे लिहून डाळींचा साठा मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 17 राज्यांमध्ये 217 व्यापाऱ्यांकडे स्टॉक मर्यादेपेक्षा जास्त डाळ आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांनी 31 लाख मेट्रिक टन डाळींचा साठा जाहीर केला आहे. सरकारने 500 मेट्रिक टन डाळीची साठा मर्यादा लागू केली आहे.आतापर्यंत 7.59 मेट्रिक टन डाळी आयात करण्यात आल्या आहेत.

सरकार परदेशातून डाळी विकत घेत आहे

मोठ्या प्रमाणात डाळीचा स्टॉक तयार करण्यासाठी सरकार आयात करीत आहे. सरकारने 1 लाख टन मसूर डाळ आयात करण्याचे आदेश दिले. गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये देशात 38.80 मेट्रीक टन, उडीद डाळ 24.50 मेट्रीक टन, मसूर 13.50 मेट्रीक टन, मूग डाळ 26.20 एमटी आणि चना डाळ 116.20 या वर्षी देशात उत्पादित करण्यात आली. तर तूर, उडीद, मसूर, मूग आणि चना डाळ अनुक्रमे 4.40 मेट्रीक टन, 3.21 मेट्रीक टन, 11.01 मेट्रीक टन, 0.52 मेट्रीक टन आणि 2.91 मेट्रीक टन या प्रमाणात आयात करावी लागली.

5 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मोझांबिकमधून डाळींच्या दीर्घकालीन आयातीबाबतच्या कराराला मान्यता दिली होती, तेव्हा पुढील 5 वर्षांत आयात दुप्पट होईल, असे सांगण्यात आले होते. भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक देश असला, तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी देशात दरवर्षी लाखो टन डाळीचा अभाव आहे. कधी दुष्काळामुळे तर कधी इतर कारणांमुळे देशांतर्गत उत्पादन घटत होत आहे.  (Central Government’s relief: Dali rates to remain limited, big decision in the face of festival)

इतर बातम्या :

जैसे ज्याचे कर्म तैसे.., चोरीसाठी दोन साथीदारांना घेऊन इमारतीवर चढला, चौथ्या मजल्यावर तोल गेला आणि….

किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या फैरी, अजित पवारांनी एका वाक्यात निकाल लावला!

औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी ?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली