AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांसाठी (Farmers) राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी (agri) योजना आता एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना 'महाडीबीटी' (MahaDBT)पोर्टलवरून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

कृषी योजना एकाच छताखाली; 'महाडीबीटी' पोर्टलवरून घ्या लाभ, अर्ज करण्याचे आवाहन
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 5:17 PM
Share

नाशिकः शेतकऱ्यांसाठी (Farmers) राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी (agri) योजना आता एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ (MahaDBT)पोर्टलवरून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. (Various agricultural schemes under one roof; Benefits can be availed from ‘MahaDBT’ portal)

राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांठी अनेक कृषी योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे अनेक जण या योजनांपासून वंचित राहतात. अनेकांनी योजनेसाठी अर्ज केलेला असतो. पण त्या अर्जाचे पुढे काय झाले हे ही त्यांना माहित नसते. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सरकार किंवा प्रशासनाला पोहचणेही शक्य नसते. हे ध्यानात घेता आता शासनाच्या ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून विविध कृषी योजना एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. या योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केल्यास या विशेष सेवेअंतर्गत एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. दरम्यान, सरकारचा हा उद्देश चांगला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांजवळ अँड्रॉइड मोबाइल नाही किंवा ज्यांना तो वापरता येत नाही, त्यांच्यासाठी या योजनेचा म्हणावा तसा लाभ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीमार्फत या योजनांचा प्रसार केल्यास त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला मदत मिळणार आहे. सरकारने त्यावरही भर द्यावा, अशी मागणी काही प्रगतीशील शेतकऱ्यांनी केली आहे.

संकेतस्थळावर करा अर्ज कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची निवड होवून देखील कागदपत्रे अपलोड केले नाहीत, अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ आपले कागदपत्रे महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज रद्द करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या आहेत.

हेल्पलाइनवर साधा संपर्क संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करताना काही तांत्रिक अडचणी आसल्यास किंवा अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा दूरध्वनी क्रमांक 020-25511479 व helpdeskdbtfarmer@gmail.com इमेलवर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Various agricultural schemes under one roof; Benefits can be availed from ‘MahaDBT’ portal)

इतर बातम्याः

बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

महापालिकेमुळे डेंग्यू; पेस्ट कंट्रोल कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.