AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडचणीच्या काळातही येवला-लासलगावकरांची मला खंबीर साथ; छगन भुजबळ भावूक

अडचणीच्या काळात येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अडचणीच्या काळातही येवला-लासलगावकरांची मला खंबीर साथ; छगन भुजबळ भावूक
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 4:13 PM
Share

नाशिक : अडचणीच्या काळात येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तुमचा हा विश्वास आणि प्रेम असेच कायम राहुद्या असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Yeola-Lasalgaonkar’s strong support to me even in difficult times : Chhagan Bhujbal)

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला दौरा केला. यावेळी येवलेकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत भव्य सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते आंबदास बनकर, अरुण थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव गुंड, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!

छगन भुजबळ यांना गुरुवारी सर्वात मोठा दिलासा मिळाला. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने गुरुवारी याबाबत सर्वात मोठा निर्णय दिला. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची जेलवारीदेखील झाली होती.

या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना दोषमुक्तता करण्यात आलं आहे. तेव्हा ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विकासक चमणकर कुटुंबियांतील चौघांसह एका पीडब्ल्यूडी अभियंत्याचा यामध्ये समावेश होता. मात्र आज छगन भुजबळांचं नावही या प्रकरणातून वगळण्यात आलं.

कोणाकोणाची नावं वगळली?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकण कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांचं नावही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आलं आहे.

इतर बातम्या

उत्तर प्रदेशात 403 ऐवजी 100 जागा लढवणार, 24 तासात शिवसेना बॅकफूटवर; महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या सेना नेत्यांमध्ये संभ्रम?

गोवा, उत्तर प्रदेशात मविआचा प्रयोग; गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

(Yeola-Lasalgaonkar’s strong support to me even in difficult times : Chhagan Bhujbal)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.