AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेट सेट गो..नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज, पीएम मोदी या तारखेला करु शकतात उद्घाटन

नवीमुंबई्च्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला DGCA ने एअरोड्रम परवाना दिला आहे. त्यामुळे हे विमानतळ प्रवाशांसाठी खुले करण्यास मंजूरी मिळाली आहे. या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यत आहे.

गेट सेट गो..नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज, पीएम मोदी या तारखेला करु शकतात उद्घाटन
| Updated on: Oct 01, 2025 | 8:13 PM
Share

नवीमुंबई येथील नवीन आंतराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच मोठ्या समारंभात प्रवाशांसाठी उद्घाटन होणार आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी या अत्याधुनिक विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अदानी ग्रुपद्वारा संचालित या नव्या विमान तळाला नागरी उड्डयन महासंचालनालयाकडून (DGCA) नुकतेच एअरोड्रम लायसन्स मिळाले आहे. त्यामुळे या विमानतळाने सर्व सुरक्षा आणि नियमांची पूर्तता केल्याचे हे प्रमाणपत्र असल्याने हा विमानतळ आता सेवेसाठी सज्ज झाला आहे.

गौतम अदानी यांनी कामगारांची भेट घेतली

या नव्या विमानतळाच्या उद्घाटनाच्या तयारीच्या निमित्ताने अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी एअरपोर्टच्या निर्मितीत गुंतलेल्या बांधकाम कामगार,दिव्यांग कर्मचारी, महिला कर्मचारी, इंजिनिअर, कारागिर, फायर फायटर आणि सुरक्षा गार्ड यांच्या व्यक्तीगत भेट घेतली. अदानी म्हणाले की हे यश हजारो हातांच्या मेहनतीचे फळ आहे. जेव्हा हे विमानतळ लाखो उड्डाणे आणि कोट्यवधी प्रवाशांना जोडण्याचे काम करेल, तेव्हा लोकांच्या मेहनतीचे प्रतीध्वनी प्रत्येक उड्डाण आणि प्रत्येक पावलावर जाणवले.

एअरोड्रमचे मिळाले लायसन्स

एअरपोर्टला मिळणारे DGCA चे एअरोड्रमचे लायसन्स या क्षेत्राला जगाशी जोडण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या सिडकोने या विमानतळाला पाच टप्प्यात विकसित केले आहे. पहिल्या टप्प्यात या एअरपोर्टची क्षमता सुमारे २ कोटी प्रवाशांना वार्षिक सेवा देणे हा आहे.

इंडिगो आणि एअर इंडिया पहिली सेवा सुरु करणार

एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर सारख्या प्रमुख एअरलाईन्सने नवीमुंबई एअरपोर्टवरुन उड्डाण सेवा सुरु करण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. खास म्हणजे देशाची सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो या विमानतळावरुन पहिले कमर्शियल उड्डाण संचालित करणार आहे. इंडिगो पहिल्याच दिवशी १५ हून अधिक शहरांसाठी सुमारे १८ दैनिक उड्डाणे संचलित करणार आहे. एअर इंडिया देखील पहिल्या टप्प्यात देशातील १५ शहरांना जोडणाऱ्या दैनिक उड्डाणे संचालित करणार आहे.

येथे पाहा पोस्ट –

भारताचा पहिला ऑटोमेटेड कार्गो टर्मिनल

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर देशातील पहिला संपूर्णपणे ऑटोमेटेड कार्गो टर्मिनल स्थापन केलेला आहे. या सुविधने केवळ कार्गोचे संचालनच वेगात होणार नाही तर लॉजिस्टीक्स सेक्टरमध्ये देखील क्रांतीकारी बदल होणार आहेत. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट एकूण 1,160 हेक्टरवर पसरला असून हा आकार आणि क्षमता दोन्हीच्या बाबतीत प्रचंड विशाल आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.