AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव द्यावं; रामदास आठवले मैदानात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीला रामदास आठवले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव द्यावं; रामदास आठवले मैदानात
Ramdas Athavale
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 04, 2021 | 6:30 PM
Share

मुबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला आपला जाहीर पाठिंबा आहे. तसेच नामकरण आंदोलनात आपला पक्ष सर्व शक्तिनिशी मैदानात उतरेल अशी स्पष्ट ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. (Navi Mumbai International Airport should be named after D B Patil; Demand of Ramdas Athavale)

दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने आज रामदास आठवले यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी आठवले बोलत होते.

मागणीसंदर्भात कृती समिती शरद पवारांची भेट घेणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा प्रश्न हा राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहे. राज्य शासनाने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी असा संकेत आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकभावनेचा राज्य शासनाने आदर करायला हवा. यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घ्यावी, अशी भेट व्हावी यासाठी आपण व्यक्तिशः प्रयत्न करु असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.

आंदोलनात आरपीआय सहभागी होणार

दिबांच्या नावासाठी होणाऱ्या आंदोलनात आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते सर्व ताकदीनिशी सहभागी होतील, असेही रामदास आठवले यांनी जाहीर केले. तसेच 10 जूनच्या मानवी साखळी आंदोलनाला आणि 24 जूनच्या सिडको भवनाला घेराव घालण्याच्या आंदोलनालाही रिपब्लिकन पक्षाचा पाठिबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

स्थानिकांची मागणी

तत्पूर्वी दिबा यांच्या नावासंबंधीची भूमिका सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी रामदास आठवले यांच्यापुढे विषद केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनीधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार राज्य आणि केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे.

1984 साली राज्यव्यापी शेतकरी आंदोलन

1984 साली दिबांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई गावी, शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली अशा शेतकरी आंदोलनात पाच शेतकर्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या आंदोलनातून प्रस्थापित झालेले साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचे तत्त्व पुढे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. नवी मुंबईच्या विकासासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर जनतेच्या प्रश्नांसाठी दिबांनी संबंध आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळे त्यांच्या या कर्मभूमीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करणे, ही येथील सर्व जनतेची रास्त मागणी आहे, असे दशरथ पाटील यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार

आता डिस्चार्जआधीच रुग्णालयाच्या बिलांचे लेखा परीक्षण, नवी मुंबई महापालिकेत कोव्हिड-19 बिल तक्रार निवारण कक्ष

(Navi Mumbai International Airport should be named after D B Patil; Demand of Ramdas Athavale)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा