AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मांजरीला पकडलं, प्लास्टिकच्या पिशवीत भरलं अन्… जोडप्याचं संतापजनक कृत्य CCTV मध्ये कैद

अनेक जण मांजर घरात पाळतात आणि तिची प्रचंड काळजी घेतात. पण आता असा एक व्हिडीओ समोर येत आहे ज्यामध्ये जोडप्याने मांजरीला आधी पकडलं, तिला पिशवीत भरलं आणि... या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली आहे.

मांजरीला पकडलं, प्लास्टिकच्या पिशवीत भरलं अन्... जोडप्याचं संतापजनक कृत्य CCTV मध्ये कैद
| Updated on: Jun 18, 2026 | 1:22 PM
Share

Kharghar News: नवी मुंबईतील खारघर परिसरात मुक्या प्राण्यासोबत असं काही घडलं आहे. ज्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशाने कथितरीत्या सोसायटीतीलच एका मांजरीला प्लास्टिकच्या पिशवीत कोंडून तिला अज्ञात ठिकाणी सोडून दिलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पुरुष आधी मांजरीला प्रेमात उचलतो आणि प्लास्टिकच्या पिशवीत टाकतो. पण तेव्हा मांजर स्वतःची सुटका करते. पण तो पुन्हा मांजरीच्या मागे जातो आणि तिला पडकतो. तेव्हा एक महिला प्लस्टिकची पिशवी घेऊन उभी दिसत आहे.. पुरुष मांजरीला पिशवीत टाकतो आणि पिशवी घट्ट बांधतो… त्यानंतर घरात घेऊन जातो. त्यानंतर त्याने मांजरीचं काय केलं… याबद्दल काही कळू शकलेलं नाही.

दरम्यान घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर 19 मधील आदित्य हाइट्स सोसायटीत मांजरीसोबत क्रूरतेचा प्रकार घडला ईहे… सेक्टर 19 मधील आदित्य हाइट्स सोसायटीमध्ये एका मांजरीला प्लास्टिकच्या पिशवीत भरून अज्ञातस्थळी फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या घटनेनंतर सोसायटीतील रहिवासी आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, बेपत्ता झालेल्या त्या मांजरीचा शोध सुरू असून याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर प्राण्यांवर होणाऱ्या वाईट कृत्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता एका मांजरीचा व्हिडीओसमोर आला आहे. पण याआधी अनेक श्वान आणि हत्ती यांच्यासोबत देखील वाईट वागणूक करताना लोकांचे व्हिडीओ समोर आले. मुक्या प्राण्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीवर प्राणी प्रमी कामय आवाज उठवत असतात.

Follow Us
तासाभरात स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा....
Sanjay Shirsat | तासाभरात सर्व स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा, नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जलद घडामोडी! अधिकृत घोषणा कधी? नव्या
'ऑपरेशन टायगर'ची अधिकृत घोषणा कधी? मुहूर्त ठरला... थेट शिंदेच...
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर, अखेर खासदार फुटले?
वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना
वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना सर्वात मोठा दणका; थेट...
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट!
अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, दिल्ल
मोठी बातमी! अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, काही काळातच...
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; 6 खासदारांच्या फुटीनंतर उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच द
Big Breaking | व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच दिली महत्त्वाची माहिती; अखेरचा...
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणा
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणारे दोन खासदार...
तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही
Sanjay Raut | तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही; राऊतांचा बंडखोरांना इशारा