AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena Crisis : ‘या’ कारणामुळे बंडखोर खासदारांचा भडका, बैठकीकडे फिरवली पाठ, मोठी अपडेट समोर

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचा व्हिप धुडकावून ६ खासदारांनी दिल्लीतील बैठकीकडे पाठ फिरवली, ज्यामुळे गटात फुटीची शक्यता वाढली आहे. संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे खासदार नाराज झाल्याची चर्चा आहे. आता या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाईची तयारी सुरू आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे नाट्य सुरू आहे.

Shiv Sena Crisis : 'या' कारणामुळे बंडखोर खासदारांचा भडका, बैठकीकडे फिरवली पाठ, मोठी अपडेट समोर
ठाकरे गटातील फूटीमुळे खळबळ
| Updated on: Jun 18, 2026 | 1:14 PM
Share

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याच्या चर्चा असून गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र आणि राजाधानीत मोठं नाट्य सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेने व्हिप जारी केला. आज दिल्लीत पक्षाच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली, त्याला हजर राहण्याचे आदेश सहाही खासदारांना देण्यात आले होते. मात्र 11 वाजता सुरू झालेल्या आणि तासाभरानतंर संपलेल्या या बैठकीला 9 पैकी फक्त 3 खासदार उपस्थित होते, 6 बंडखोर खासदारांपैकी एकही उपस्थित नव्हता. यामुळे हे प्रकरणा आणखीनच चिघळले असून आता या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, तसेच त्यांच्यावर कारवाईचीही शक्यता व्यक्त होत आहे.

या कारणामुळे फिरवली बैठकीकडे पाठ 

दरम्यान या खासदारांनी बैठकीकडे का पाठ फिरवली याचं एक मोठं कारणही समोर आलं आहे. काल दिल्लीत ठाकरे गटाची झालेल्या पत्रकार परिषद झाली आणि तीच पत्रकार परिषद पक्षाला भोवल्याची चर्चा सरू आहे. कासंजय राऊत, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई हे कालपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. काल काळी पत्रकार परिषेददरम्यान राऊत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी खासदारांना उद्देशून अपश्बद उच्चारले. त्यामुळे खासदार आणखीनच नाराज झाले. त्यामुळे पक्षाकडून व्हीप बजावण्यात आल्यानंतरही या नाराज खासदारांनी आजच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले , अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे सहा खासदार अनुपस्थित

आज दिल्लीत झालेल्या बैठकीत फक्त संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे चौघे उपस्थित होते. तर संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय (बंडू) जाधव, ओमराजे निंबाळकर , संजय वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर या ससाही खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली, व्हीप बजावूनही त्यांनी पक्षाचा आदेश धुडकावला आणि कोणीही बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे कालची ठाकरे गटाची पत्रकार परिषद भोवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे बंडखोर खासदार नाराज झाले. खासदारांबद्दल ज्या प्रकारे काल अपशब्द वापरण्यात आले, त्यामुळे ते  खासदार दुखावले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचाच परिणाम म्हणून सर्व खासदारांनी आजच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुढे काय होणार हे अत्यंत महत्वाचे असून राज्याचे, देशाचे लक्ष या घडामोडींकडे लागलं आहे.

Follow Us
मातोश्री परिसरात बॅनरबाजी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; कोण दाखवणार ताकद
Shivsena Banner | मातोश्री परिसरात बॅनरबाजी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; उद्या कोण दाखवणार ताकद?
तासाभरात स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा....
Sanjay Shirsat | तासाभरात सर्व स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा, नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जलद घडामोडी! अधिकृत घोषणा कधी? नव्या
'ऑपरेशन टायगर'ची अधिकृत घोषणा कधी? मुहूर्त ठरला... थेट शिंदेच...
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर, अखेर खासदार फुटले?
वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना
वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना सर्वात मोठा दणका; थेट...
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट
या पेक्षा वेश्या बऱ्या; 6 खासदार फुटताच संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट!
अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, दिल्ल
मोठी बातमी! अजूनही ते सहा खासदार आलेच नाहीत; संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात, काही काळातच...
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; 6 खासदारांच्या फुटीनंतर उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच द
Big Breaking | व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच दिली महत्त्वाची माहिती; अखेरचा...
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणा
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणारे दोन खासदार...