AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार फॉर्म्यूला नाईट स्ट्रिट रेस, डिसेंबरमध्ये रंगणार थरार!

महाराष्ट्रात येत्या डिसेंबर महिन्यात इंडियन रेसिंग फेस्टिव्हलअंतर्गत येणाऱ्या फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेसचा ग्रँड फिनाले नवी मुंबईत होणार आहे. या स्पर्धेच्या रुपाने आता मुंबईतल्या पहिल्यावहिल्या एआयए-ग्रेड स्ट्रीट सर्किटची सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार फॉर्म्यूला नाईट स्ट्रिट रेस, डिसेंबरमध्ये रंगणार थरार!
Formula Night Street Race
| Updated on: Sep 20, 2025 | 4:46 PM
Share

Formula Night Street Race : महाराष्ट्रात वेगवेगळ्या खेळांना चालना मिळावी म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. खेळाडूंना सर्व सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, मैदाने मिळावीत यासाठी राज्याचे क्रीडा मंत्रालय सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असते. असे असतानाच आता महाराष्ट्राने आता फॉर्म्यालू नाईट स्ट्रीट रेसिंगमध्येही पाऊल टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता राज्यातील नवी मुंबईत पहिल्यांद्याच फॉर्म्यूला स्ट्रीट रेसिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतेच रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिडेट आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.

फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेसचा ग्रँड फिनाले

या करारानुसार आता महाराष्ट्रात येत्या डिसेंबर महिन्यात इंडियन रेसिंग फेस्टिव्हलअंतर्गत येणाऱ्या फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेसचा ग्रँड फिनाले नवी मुंबईत होणार आहे. या स्पर्धेच्या रुपाने आता मुंबईतल्या पहिल्यावहिल्या एआयए-ग्रेड स्ट्रीट सर्किटची सुरुवात होणार आहे. रेसिंगचा हा ट्रॅक एकूण 3.753 किमीचा असेल. या ट्रॅकवर एकूण 13 वळण असतील. पाम बिच रोड, नेरुळ तलाव असा या ट्रॅकचा मार्ग असेल. भारतातील मोटरस्पोर्ट क्षेत्राच्या विकासासाठी हा फार मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असल्याचे बोलले जात आहे.

रोजगारनिर्मती होईल, पर्यावरणास चलना मिळणार

या यशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई स्ट्रीट रेस महाराष्ट्राच्या मोटास्पोर्ट प्रवासातील मैलाचा दगड आहे. या करारामुळे अनके तरुण रेसर्सना प्रेरणा मिळेल. यामुळे नव्या रोजगाराचाही निर्मिती होईल. तसेच यामुळे पर्यटनासही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

हा करार झाल्यानंतर आरपीपीएलचे अध्यक्ष अखिलेश रेड्डी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नवी मुंबई महापालिकेचा पाठिंबा यांच्या मदतीने एक अतुलनीय असा मोट रेसिंग आयोजित करण्यात येणार आहे, असे मत रेड्डी यांनी व्यक्त केले.

याआधी हैदराबाद, चेन्नई, कोईंबतुर, गोवा इथं रेसिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलेल आहे. त्यानंतर आता देशात मोटस्पोर्ट वृद्धींगत होण्यासाठी मुंबईत ही रेसिंग आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे या रेसिंगकडे संपूर्ण भारताचे, जगाचे लक्ष असणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.