पनवेलमध्ये किरकोळ वादातून महिला पोलीस शिपाईकडून आपल्या सहकार्‍याच्या हत्येची सुपारी, तीन आरोपींना अटक

पनवेल रेल्वे स्टेशन ते मालधक्का जाणार्‍या रस्त्यावर भगत चाळीसमोर काही दिवसांपूर्वी मयत पोलीस शिवाजी माधवराव सानप (54) यांना अज्ञात वाहनाने धडक मारल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

पनवेलमध्ये किरकोळ वादातून महिला पोलीस शिपाईकडून आपल्या सहकार्‍याच्या हत्येची सुपारी, तीन आरोपींना अटक
किरकोळ वादातून महिला पोलीस शिपाईकडून आपल्या सहकार्‍याच्या हत्येची सुपारी
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 5:13 PM

पनवेल : किरकोळ वादातून मुंबई पोलीस दलात कार्यरत असणार्‍या एका महिला पोलीस शिपाईने आपल्या पोलीस सहकार्‍याची सुपारी देवून त्याची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले. याबाबत मयत पोलिसाच्या कुटुंबियांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने आणि घटनास्थळावरील काही संशयास्पद हालचालींवरुन पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली. (a female police constable ordered the killing of her colleague in panvel)

अशी केली हत्या

पनवेल रेल्वे स्टेशन ते मालधक्का जाणार्‍या रस्त्यावर भगत चाळीसमोर काही दिवसांपूर्वी मयत पोलीस शिवाजी माधवराव सानप (54) यांना अज्ञात वाहनाने धडक मारल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक स्वरुपात मोटार अपघात म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला होता. परंतु या घटनेसंदर्भात सानप यांच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला. तसेच पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून काही गोष्टी त्यांच्या समोर आल्याने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह.पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा.पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली.

हत्या करुन अपघात दर्शविण्याचा प्रयत्न

घटनास्थळ, परिसर व सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन, आलेले फोन, केलेले फोन व इतर तांत्रिक तपासाचा आधार घेवून व त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. शिवाजी सानप हे रेल्वे स्थानकात उतरुन पायी जात असताना यातील आरोपी विशाल जाधव व गणेश चव्हाण उर्फ मुदावथ याने त्यांच्या ताब्यातील नॅनो गाडीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक सानप यांना जबर ठोकर मारली. या गुन्ह्यात वापरलेली नॅनो कार सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. सखोल तपासामध्ये शिवाजी सानप हे जेथे कार्यरत होते. त्या ठिकाणी महिला पोलीस शिपाई शितल पानसरे या सुद्धा कार्यरत होत्या. त्यांच्या दोघांमध्ये ओळख होती. परंतु त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरुन सूड घेण्याच्या उद्देशाने आरोपी शितल पानसरे हिने तिच्या घरात घरकाम करणारा विशाल जाधव व त्याचा मित्र गणेश चव्हाण यांना पैसे देवून त्यांची मदत घेवून जीवे ठार मारण्याचा कट रचून तो यशस्वी केला. परंतु पोलिसांनी सखोल चौकशीद्वारे यांना ताब्यात घेतले आहे.

यामध्ये प्रामुख्याने अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, पोनि विजय कादबाने, पोनि संजय जोशी, सपोनि देवळे, सपोनि, हुलगे, सपोनि पवार, सपोनि दळवी, पोउपनि फरताडे, पोहवा राउत, पोहवा वाघमारे, पोहवा गथडे, पोना म्हात्रे, पोशि खेडकर, पोना राठोड, पोना राउत, पोना पारासुर, पोना साळूखे, पोना देशमुख, पोना पाटील नमुद गुन्हयाचे मुळापर्यंत जावून अतिउत्कृष्ट तपास करुन चांगली कामगिरी केली आहे. याबाबत अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. (a female police constable ordered the killing of her colleague in panvel)

इतर बातम्या

400 जणांची चौकशी, 150 सीसीटीव्हींचा तपास, आठ दिवस पोलिसांची तारांबळ, अखेर मुलानेच आईची हत्या केल्याचं उघड

Baap Beep Baap : वडील आणि मुलामध्ये मैत्रीचे बंध निर्माण करणारं नवं गाणं, ‘बाप बीप बाप’मधील ‘वय नाही’ प्रेक्षकांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.