Maratha Reservation: ‘सारथीवर खासगी संचालकांच्या नियुक्त्या हा आंदोलन निष्प्रभ करण्याचा डाव’

Sarathi Maratha Reservation | सारथीवर संचालक नेमण्याचा विषय असेल तर राज्यातील सर्व संघटनाना विचारत घ्यावे. चुकीचा निर्णय घेत असाल तर तो खपवून घेणार नाही. समाजाची असून यावर कोणी डोळा ठेवून आंदोलन करत असतील तर ती मान्य नाहीत, असे आबासाहेब पाटील यांनी म्हटले.

Maratha Reservation: 'सारथीवर खासगी संचालकांच्या नियुक्त्या हा आंदोलन निष्प्रभ करण्याचा डाव'
आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चा

नवी मुंबई: सारथी संस्थेवरील खासगी संचालकांच्या नियुक्त्या हा मराठा आंदोलन निष्प्रभ करण्याचा डाव असल्याची टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी केली. राज्य सरकारने प्रथम सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही आबासाहेब पाटील यांनी केली. (Maratha leader Abasaheb Patil on Sarathi)

ते शुक्रवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी सारथी संस्थेवरील संचालक नियुक्तीवरुन आक्रमक भूमिका घेतली. सारथीवर संचालक नेमण्याचा विषय असेल तर राज्यातील सर्व संघटनाना विचारत घ्यावे. चुकीचा निर्णय घेत असाल तर तो खपवून घेणार नाही. समाजाची असून यावर कोणी डोळा ठेवून आंदोलन करत असतील तर ती मान्य नाहीत, असे आबासाहेब पाटील यांनी म्हटले.

समाजाचा निर्णय आहे तो सर्वांसमोर झाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांची मते घेऊन घ्यावीत. मगच निर्णय घ्यावा चुकीचा निर्णय घेत असाल तर तो खपवून घेणार नाही, असेही आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

…तर सारथी संस्था मराठा आरक्षणालाही भारी पडेल, संभाजीराजेंचं मोठं विधान

सारथी संस्थेच्या माध्यमातून योग्यप्रकारे काम झाले तर ते मराठा आरक्षणापेक्षाही फायदेशीर ठरेल, असे वक्तव्य मध्यंतरी संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. सारथी हा विषय माझ्या आणि समाजाच्या ह्रदयातील विषय आहे. सारथी संस्था शाहू महाराजांच्या नावाने उभी केलेली संस्था आहे. त्याची काय अवस्था करुन टाकली आहे. सरकारने सारथीला स्वायत्तता देऊन त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली तर आगामी काळात आरक्षणापेक्षा सारथी चांगली ठरेल. मी हे मोठं विधान करतो आहे. आरक्षण आपल्या हक्काचं आहे, पण चांगली अंमलबजावणी झाली तर सारथी आरक्षणापेक्षा जास्त उपयोगी ठरेल, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आम्ही सारथीला जागा दिली. त्यांनी जागा द्यायलाच पाहिजे, पण नुसतं जागा देऊन होणार नाहीये. स्वायत्तता म्हणजे फक्त 9 माणसं ठेवणं नाही. ज्याला समाजाचं काही समजतं, जो जमिनीवर काम करतो, ज्यानं आपलं आयुष्य समाजासाठी दिलंय त्यांना त्या समितीत घेतलं पाहिजे. सगळे आयएएस अधिकारी घेतले आहेत. त्यातील काही निवृत्त आहेत. ते काय करणार आहेत, त्यांना समाजाशी काय देणंघेणं आहे? जर सारथी मराठा समाजासाठी काढली आहे तर समाजातीलही 2-3 चांगली माणसं घ्यायला हवी, असेही संभाजीराजे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

SARTHI Meeting | अजित पवारांचा धडाका, दोन तासात ‘सारथी’ला 8 कोटी, परिपत्रक जारी

“…तर सारथी संस्था मराठा आरक्षणालाही भारी पडेल”, संभाजीराजेंचं मोठं विधान

‘सारथी’चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी, संभाजीराजे आक्रमक

(Maratha leader Abasaheb Patil on Sarathi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI