AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SARTHI Meeting | अजित पवारांचा धडाका, दोन तासात ‘सारथी’ला 8 कोटी, परिपत्रक जारी

या बैठकीनंतर अवघ्या 2 तासात सारथी संस्थेला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे

SARTHI Meeting | अजित पवारांचा धडाका, दोन तासात 'सारथी'ला 8 कोटी, परिपत्रक जारी
| Updated on: Jul 09, 2020 | 8:25 PM
Share

मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या (Ajit Pawar Sanctioned 8 Crore To Sarthi) व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरु केलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीनंतर अजित पवारांनी या सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. या बैठकीनंतर अवघ्या 2 तासात सारथी संस्थेला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे (Ajit Pawar Sanctioned 8 Crore To Sarthi).

मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

“सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं”, असं अजित पवार या बैठकीदरम्यान म्हणाले. तसेच, सारथीला 8 कोटी उद्याच दिले जातील, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र, बैठकीनंतर अवघ्या दोन तासांच्या आत सारथीला 8 कोटी देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

सारथी निधी मिळाल्यानतंर छत्रपती संभाजीराजे यांचं ट्विट

“दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करुन घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करुन घेता येतं. वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल”, असं ट्विट छत्रपती संभाजीराजेंनी केलं

संभाजीराजे काय म्हणाले?

मराठा समाजानं गैरअर्थ घेऊ नये. काही निर्णय घ्यायचे होते म्हणून अजित दादांनी दालनात बैठक घेतली. या संस्थेची स्वाययत्ता कायम राहिली पाहिजे. सारथी टिकवायची आहे, स्वायत्तता टिकवायची आहे, पवार साहेबांनी निर्णय घेतलेत, कुणी गोंधळ आणि गैरसमज करुन घेऊ नये, पूर्वीच्या सचिवांनी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढली, पवारांनी शब्द दिलाय, सारथीची स्वायत्तता टिकेल, त्याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली.

सारथी ही शाहू महाराजांच्या नावाने सुरु असलेली संस्था, ती बंद होणार नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम आणि सारथीचं काम आता एकाच छताखाली सुरु होईल. सारथी टिकवण्यासाठी इथं आलोय, सारथीची जबाबदारी अजित पवारांनी घेतली, पवारांनी शब्द दिला, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले (Ajit Pawar Sanctioned 8 Crore To Sarthi).

सारथी ही संस्था भविष्यात स्वत:च्या पायावर उभी राहिल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करु, सरकारकडून मदतीऐवजी आर्थिक रसद स्वत: उभा करण्याकडे कल असेल, अशी योजना संभाजीराजेंनी सांगितली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

बैठकीत गदारोळ

अजित पवार यांनी सारथीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजेंना स्वतः फोन करुन बोलावलं होतं. मात्र, बैठकीत संभाजीराजे यांना खाली बसवल्याचा मुद्दा उपस्थित करत संभाजीराजेंच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मराठा समन्वयकांसोबत सुरु झालेली बैठक लगेचच आटोपली. विशेष म्हणजे यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलण्यास सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी आपण दालनात बोलू असं म्हणत बैठक सोडली. यानंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी जाणून बुजून छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केल्याचा आरोप केला.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, “मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.”

संभाजीराजे यांनी आवाहन करुनही त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत संभाजीराजेंना वरती येण्याचा आग्रह केला. परंतु संभाजी राजे तिसऱ्या ओळीत बसले. त्यांनी कार्यकर्त्यांना न गोंधळ घालण्याचं आवाहन केलं. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

 Ajit Pawar Sanctioned 8 Crore To Sarthi

संबंधित बातम्या :

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ, संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

SARTHI Meeting: सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.