AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली : अस्लम शेख

काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका केली. (Aslam Shaikh slams BJP)

खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली : अस्लम शेख
| Updated on: Jan 17, 2021 | 5:43 PM
Share

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज (17 जानेवारी) मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या मेळाव्यात भाषण करताना काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी नवी मुंबईच्या नागरिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं (Aslam Shaikh slams BJP).

“खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली आहे. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनासोबत इतके वर्ष होती. ज्यांचा बोट धरून तुम्ही महाराष्टामध्ये आलात त्याच सेनेला हे सपवंत होते. आता शिवसेना चांगलं काम करतंय तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला”, असा घणाघात अस्लम शेख यांनी केला (Aslam Shaikh slams BJP).

“गेल्या दहा-बारा वर्षात या नवी मुंबईसाठी काहीतरी करायची गरज होती. पण भाजपने निव्वळ खायचं काम केलं. आम्ही आश्वासन देतो, इथल्या भूमीपुत्रांसाठी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवासाठी आम्ही नक्की निर्णय घेऊ. कॅबिनेट मिटिंगमध्ये नवी मुंबईत बंदर कसे येईल यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ”, असं आश्वासन त्यांनी दिलं.

“नवी मुंबईची सध्याची परिस्थिती सर्व बघत आहेत. बदल का हवा? हा प्रश्न नवी मुंबईचा नाही तर देशाचा आहे. आता बदल हवा. धनदांडग्यांना आता घरी बसवायची गरज आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान भाजप शिस्तबद्ध पद्धतीने संपवत आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“गॅसचे भाव किती झाले? पेट्रोल-डिझेलचे दर किती वाढले? यावर का बोलत नाही, देश कसा चालेल? आज देश संकटात आहे. मात्र भाजपला त्याचे काही नाही. तुम्ही पक्ष बघू नका फक्त महाविकास आघाडी बघून मतदान करा”, असं आवाहन अस्लम शेख यांनी केलं.

“शशिकांत शिंदे यांनी केलेली विनंती नक्की पूर्ण होणार. नवी मुंबईत बंदर येणार म्हणजे येणार. मुघलांसमोर तलवार ठेवली असती तर इतिहास घडला नसता. व्यापार करणारा व्यपारच करणार. पण या व्यापाऱ्याला आता तुम्ही घरी बसवायची तयारी केली पाहिजे. माझी विनंती की, आता तुम्ही पक्का निर्णय घ्या. महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा. आम्ही तुमच्याशी तत्पर पण तुम्हीसुद्धा तत्पर राहा, बघा विकास कसा होतो”, असं अस्लम शेख म्हणाले.

मेळाव्यात शशिकांत शिंदे काय म्हणाले?

  • नगरसेवकांची यादी पाहिली तर महाविकास आघाडीचे उमेदवार भक्कम आहेत. लोकांची त्यांना पसंती आहे. निवडणुकीत धनशक्तीचा वापर विरोधक करतील. विरोधक अनेक आरोप करतील, पण आपण जनशक्तीच्या बळावर जिंकून येऊ हा विश्वास ठेवा.
  • काही वर्षांआधी भाजप केंद्रात सत्तेत आले. मात्र शेतकरी राजाला त्यांनी नाराज केले आहे. भाजपवाले या ना त्या कारणाने सत्ता पडेल, अशी चर्चा घडवून आणत आहेत. पण आमचे संजय राऊत यांना पुरून उरतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे खंबीर आहेत.
  • आता नवी मुंबईची धनशक्ती मोडीत काढायची आहे. बघा 18 तारखेला ग्रामपंचायत निकाल लागेल. बघा या निकालात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल. त्यामुळे आपण नवी मुंबईचा विचार करावा. आपण ही लढाई जिंकू. जे आलेत त्यांचे स्वागत पण जर तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका. तुम्हाला सोडून देणार नाही. तुमचा विचार नक्कीच आम्ही सर्व करू.
  • सर्व क्षेत्रातील आणि धर्माचे लोकं महाविकास आघाडीत आहेत. माझा पराभव झाला, पण मला या सर्व नेत्यांनी विधान परिषदेवर पाठवलं. अस्लम शेख साहेब माझी एक मागणी आहे. ससून डॉक बंद होत आहे आपण त्याच बंदराचे स्थलांतरण नवी मुंबईत करावे. इथले स्थानिक भूमिपूत्र महाविकास आघाडीचे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्ही मिटिंग लावा पोर्ट करण्याचा निर्णय घ्या. मी स्वतः आणि जितेंद्र आव्हाड सोबत आहोत.
  • एपीएमसी आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्किंगची जागा आहे. तिथे पंतप्रधान आवास योजना आणत आहेत? त्याला आमचा विरोध आहे. नवी मुंबईची शोभा घालवू नका. हे भाजप खालच्या पातळीचे आंदोलन करत आहे. रडीचा डाव करतंय, कुणावर खोट आरोप करताय, देशावर राज्य करण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.