AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iskcon Temple : नवी मुंबईतील इस्कॉन मंदिरातील चोरी प्रकरणी बांग्लादेशी घुसखोरांना अटक, 80 हजार रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत

सदर आरोपींनी नवी मुंबईतील खारघर सेंट्रल पार्क स्थित इस्कॉन मंदिरात चोरी केली होती. यावेळी आरोपींनी मंदिरातील तीन दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखा या आरोपींचा शोध घेत होती. आरोपी खारघरमधील ओवे गाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजू शेख आणि अमिरुल उर्फ आकाश खान या दोघांना शिताफीने अटक केली.

Iskcon Temple : नवी मुंबईतील इस्कॉन मंदिरातील चोरी प्रकरणी बांग्लादेशी घुसखोरांना अटक, 80 हजार रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 4:26 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई खारघर येथील प्रसिध्द इस्कॉन (ISKCON) मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख (Cash) रक्कम चोरल्या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. राजू फरहात शेख (26) आणि अमिरुल उर्फ आकाश मन्नन खान (23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 80 हजार रुपये रोख आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Bangladeshi infiltrators arrested in Navi Mumbai ISKCON temple theft case)

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना अटक

सदर आरोपींनी नवी मुंबईतील खारघर सेंट्रल पार्क स्थित इस्कॉन मंदिरात चोरी केली होती. यावेळी आरोपींनी मंदिरातील तीन दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखा या आरोपींचा शोध घेत होती. आरोपी खारघरमधील ओवे गाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजू शेख आणि अमिरुल उर्फ आकाश खान या दोघांना शिताफीने अटक केली. हे दोघेही बांग्लादेशी घुसखोर आहेत. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी दानपेटीतील रक्कम चोरल्याची कबुली दिली. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त सुरेश मेंगडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक वस्त यांनी विशेष मोहीम राबवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.

नाशिकमध्ये चंदन चोरी करणाऱ्यास बेड्या

नाशकात विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यातून चंदनचोरी करणाऱ्यास नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. जालना जिल्ह्यातून या चोरास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. जावेदखान पठाण असं या चंदनचोराचं नाव असून त्याने नाशकात येऊन अवघ्या दीड महिन्यातच 5 ठिकाणी चंदन चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपीने देवळा, मालेगाव व चांदवड तालुक्यातील हद्दीवरील गिरणारे, कुंभारडे, झाडी, कोकणखेडे, उसवाड गावातील शेतकऱ्यांना रक्त चंदनाची लागवड करण्याचे आमिष दाखवले. रक्त चंदनाचे एक झाड लावण्यासाठी 200 रुपये भरा. त्या बदल्यात तुम्हाला 20 हजार रुपये अनुदान देऊ, अशी थाप मारली. या आमिषापोटी अनेकांनी लाखो रुपये या भामट्यांच्या हवाली केलेत. (Bangladeshi infiltrators arrested in Navi Mumbai ISKCON temple theft case)

इतर बातमी

Palghar Rape : पालघरमध्ये आदिवासी महिलेवर बलात्कार, आरोपी अद्याप मोकाट

लज्जास्पद! 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात विनयभंग, डोंबिवलीत वॉर्डबॉयला अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.