तळोजा, पनवेलमध्ये लपूनछपून ‘छमछम’; दोन बारवर धाड; महिला, पुरुषांसह 71 जणांवर गुन्हे दाखल

कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत लपूनछपून बार सुरू करणाऱ्या तळोजा, पनवेलमधील दोन बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Cops raid beer bar, 71 arrested from beer bar at taloja and panvel)

तळोजा, पनवेलमध्ये लपूनछपून 'छमछम'; दोन बारवर धाड; महिला, पुरुषांसह 71 जणांवर गुन्हे दाखल
beer bar

नवी मुंबई: कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत लपूनछपून बार सुरू करणाऱ्या तळोजा, पनवेलमधील दोन बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तळोजा येथील चंद्रविलास आणि पनवेलमधील टोपाझ बारवर पोलिसांनी कारवाई करून 71 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. (Cops raid beer bar, 71 arrested from beer bar at taloja and panvel)

पनवेल परिसरात सुरू असलेल्या बारमध्ये नियमाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बार वर कारवाई करत एकूण 71 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या टीमकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या बार मालकांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे. आधी पनवेल तालुक्यातील साई निधी टोपाझ बारवर कारवाई केल्यानंतर तळोजा येथील चंद्रविलास बारवर आणि नंतर पनवेलमधील टोपाझ बारवर पोलिसांनी कारवाई करत ग्राहक आणि होटेल स्टाफवर गुन्हे दाखल केले आहेत.

बारमालकांना नोटिसा

12 सप्टेंबरच्या मध्यरात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या टीमकडून कारवाई ही करण्यात आली. तसेच बारमालकांना नोटीसा बजावण्यात आल्या. कोरोना नियमांचे उल्लंघन करत लपूनछपून हे बार सुरू होते. या प्रकरणी तब्बल 39 जणांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी पनवेल तालुक्यातील कोन येथे साई निधी टोपाझ बारवर याच पथकाने कारवाई केली होती.

14 महिलांवरही कारवाई

10 सप्टेंबर रोजी टोपाझ बार विहित वेळेत बंद करून ग्राहकांसाठी पुन्हा लपून सुरू केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. यावेळी साई निधी टोपाझ बार सुरू असल्याचे निदर्शनास आले. शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत हा बार सुरू होता. त्यामुळे याप्रकरणी 14 महिला वेटर, 9 ग्राहक आणि 9 पुरुष वेटर मॅनेजरसह 32 जणांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 32 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बार बंद होता, पण

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही बारच्या ठिकाणी पोचलो. बार बाहेरून बंद होता. मात्र, आतून ग्राहकांसाठी गुप्त पद्धतीने हा बार सुरू असल्याचं निदर्शनास आले. आम्ही नियमानुसार कारवाई करत तळोजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे, असं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांनी सांगितलं. (Cops raid beer bar, 71 arrested from beer bar at taloja and panvel)

 

संबंधित बातम्या:

मुंबई एपीएमसीत नाल्यामध्ये निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे, परिसरात एकच खळबळ

वाईन शॉप फोडून महागड्या दारुची चोरी, पॅटर्न लक्षात आाल्याने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पनवेल मनपा क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शक्कल

(Cops raid beer bar, 71 arrested from beer bar at taloja and panvel)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI