AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cidco Lottery | 2022 | घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, सिडको स्वस्तात घर विकणार?

तब्बल 5 हजार घरांसाठी लवकरच सिडकोची लॉटरी जाहीर होणार आहे. नवी मुंबईतल्या प्राईम लोकेशन्सवर सिडको नवीन वर्षात जाहिरात काढणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Cidco Lottery | 2022 | घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, सिडको स्वस्तात घर विकणार?
सिडको घर
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 4:34 PM
Share

नवी मुंबई : घर घ्यायचंय, पण कोविडमुळे महागलेले दर परवडत नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरु शकते. लवकरच सिडको तब्बल 5 हजार घरांची लॉटरी (Cidco Lottery in 2022) काढणार आहे. ही लॉटरी नवी मुंबईतील (Navi Mumbai) महत्त्वाच्या ठिकाणी असणार असून या लॉटरीमुळे हजारो लोकांचं गृहस्वप्न साकार होणार आहे.

कधी येणार लॉटरी?

2022मध्ये सिडको लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थात जानेवारी महिन्यात ही 5 हजार घरांची सोडत सिडकोकडून काढण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आता सिडकोकडून जी सोडत जाहीर केली जाणार आहे, ती सर्वसामान्य घटकांसाठी असणार आहेत. त्यामुळे मध्यम आणि उच्च आर्थिक गटातील (EWS, LIG, MIG, HIG) ग्राहकांचं गृहस्वप्न नव्या वर्षातील सिडकोच्या लॉटरीमुळे पूर्ण होऊ शकेल.

कुठे असतील सिडकोची घरं?

सिडकोतर्फे काढण्यात येणाऱ्या 5 हजार घरांची सोडत ही नवी मुंबईतल्या प्राईम लोकेशन्सवर असणार आहे. घणसोली (Ghansoli), खारघर (Kharghar), कळंबोली (Kalamboli), तळोजा (Taloja) आणि द्रोणागिरी (Dronagiri) या नोडमधील घरांसाठी सिडको लवकरच लॉटरीची जाहिरात काढेल, असं बोललं जातंय. विशेष म्हणजे खासगी विकासकांच्या तुलनेत सिडकोच्या घरांची किंमत ही स्वस्त असेल, असं सांगितलं जातंय. या घरांच्या कामला काही ठिकाणी सुरुवातही झाल्याचं कळतंय.

5 हजार घरांचा महागृहनिर्माण

घरकुल योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी ही सुवर्णसंधी असेल, असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. जानेवारी 2022मध्ये 5 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेची लॉटरी प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोविड महामारीमुळे म्हाडा आणि सिडकोनं घरांसाठी सोडत काढली नव्हती. दरम्यान, आता पुन्हा एकदा घरांची लॉटरी काढली जाण्यासाठीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच घर घेण्याचं स्वप्न बाळगून असलेल्यांना नव्या वर्षात संधी निर्माण होणार आहेत. कोविड महामारीनंतर निघत असलेल्या या लॉटरीकडे सगळ्यांची नजर लागली आहे.

घरं स्वस्त असणार की महाग?

दरम्यान, याआधी सिडकोनं काढलेल्या लॉटरीत घरांचे दरांवरुन उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आता ज्या 5 हजार (5 Thousand) घरांसाठी सोडत काढण्यात येईल, त्यांची किंमत नेमकी किती असेल, हे पाहणंही महत्त्वाचंय. मात्र खासगी विकासकांपेक्षा या घरांच्या किंमती किती असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या –

राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले, भाजप फार दूर नाही; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा

Navi Mumbai | सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे

Kalyan-Dombivali| कल्याण-डोंबिवलीत रिक्षा प्रवास महाग; पहिल्या टप्प्यात 9 रुपयांची भाडेवाढ, नागरिकांची हरकतीकडे पाठ

कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.