नवी मुंबई विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्यासाठी 9 ऑगस्टला मशाल मोर्चा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली

नवी मुंबई विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्यासाठी 9 ऑगस्टला मशाल मोर्चा
Navi Mumbai Airport
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 9:46 AM

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली (Mashal Morcha on 9th August For Giving D. B. Patils Name On Navi Mumbai International Airport).

विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे असे भूमिपूत्रांचे ठाम मत असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीने ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात रुपरेषा, नियोजन आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आमदार महेश बालदी, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यापूर्वी 10 जून रोजी मोठे जनआंदोलन केले होते. तर 24 जून रोजी पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून यासाठी लढा उभारण्यात आला. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांत जवळपास 15 ठिकाणी मानवी साखळी केली होती.

100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. इतके मोठे आंदोलन होऊनही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांतिदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात येणार आहे.

Mashal Morcha on 9th August For Giving D. B. Patils Name On Navi Mumbai International Airport

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद आता विधानभवनाच्या दारात; वसंतराव नाईकांचे नाव देण्यासाठी निदर्शने

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, त्यांना स्थानिकांबद्दल अजिबात आस्था नाही : भाजप

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.