राज ठाकरेंच्या रणरागिनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या, मनसेची नवी मुंबई महिला सेना संकटात एकवटली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रणरागिनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत. मनसेची नवी मुंबईची महिला सेना संकटात एकवटली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ‘कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

राज ठाकरेंच्या रणरागिनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या, मनसेची नवी मुंबई महिला सेना संकटात एकवटली
MNS Woman senaMNS Woman sena
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 1:54 PM

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रणरागिनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत. मनसेची नवी मुंबईची महिला सेना संकटात एकवटली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ‘कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर मनसेच्या रणरागिणी आता पुढे सरसावल्या आहेत.

पूरग्रस्तांना प्रथमोपचार किट, ब्लँकेट, कपडे, सुका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या, भांडी, पाण्याच्या बाटल्या अशा कुटुंबाला जीवनउपयोगी वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे जमेल तेवढी मदत करण्याचा निर्धार मनसेच्या महिला सेनेने केला.

मनसे महिला सेनेच्या शहर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी कंबर कसली

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नवी मुंबई शहराध्यक्षआरती धुमाळ आणि उप शहर अध्यक्षा अनिता नायडू, ऐरोली मधून उपशहर सौ. शुभांगी बंदीछोडे, कोपरखैरणे मधून उपशहर अध्यक्षा सोनिया धनके आणि दिपाली ढऊल यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळवून आपापल्या परीने पुरग्रस्तांसाठी शक्य तेवढी मदत जमा केली . म्हणतात ना, “थेंबे-थेंबे तळे साचे!” ह्या उक्तीप्रमाणे सर्व महिला महाराष्ट्र सैनिकांनी संकटात सापडलेल्या मराठी माणसांसाठी मदत केली आणि बघता-बघता गरजोपयोगी वस्तूची मोठी मदत जमा झाली. राजसाहेबांच्या या रणरागिणींचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आरती धुमाळ यांनी बेलापुर हून तर जुइनगर येथून अनिता नायडू यांनी सर्व महिला सेनेसह टेम्पो, ट्रक आणि पूर्ण बस भरून थेट मदतीला पोहोचले.

संबंधित बातम्या :

Mumbai APMC : शेतकरी, ग्राहक कंगाल, व्यापारी मालामाल, एकाच मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठी तफावत कशी?

पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई महापालिकेचा सिंहाचा वाटा, 206 स्वयंसेवकांचं पथक चिपळूणकडे रवाना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.