AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेल मनपा सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण करणार

दैनंदिन व्यवहारात नागरिकांच्या जास्तीत जास्त संपर्कात येणाऱ्या घटकांच्या लसीकरणावर पनवेल महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. निराधार, बेघरांचे, शिक्षकांचे लसीकरण केल्यानंतर गृहसंकुलांतील सुरक्षा रक्षकांना, घरकाम करणाऱ्या महिला तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिमा राबवल्या जाणार असल्याची माहिती पनवेल मनपाचे आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिली.

पनवेल मनपा सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण करणार
Panvel Municipal Corporation
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 12:54 PM
Share

नवी मुंबई : दैनंदिन व्यवहारात नागरिकांच्या जास्तीत जास्त संपर्कात येणाऱ्या घटकांच्या लसीकरणावर पनवेल महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. निराधार, बेघरांचे, शिक्षकांचे लसीकरण केल्यानंतर गृहसंकुलांतील सुरक्षा रक्षकांना, घरकाम करणाऱ्या महिला तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिमा राबवल्या जाणार असल्याची माहिती पनवेल मनपाचे आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

मनपा क्षेत्रातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गृहसंकुलांतील सुरक्षा रक्षक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच वंचित घटक ज्यांना कोरोना लस दिली गेली पाहिजे याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी असे आवाहन आनंद गोसावी यांनी केले आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनवेल मनपा क्षेत्रात दुसरी लाट ओसरल्यानंतर परत करोना रुग्णवाढ होऊ नये यासाठी पनवेल मनपाने पुढाकार घेतला आहे. शहरात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आहे. रुग्ण संख्या कमी असली तरी संपर्क साखळी तोडण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यासाठी दैनंदिन कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

महापालिका क्षेत्रातील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राला भरघोस प्रतिसाद

लवकरच शाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती (17 ऑगस्ट रोजी) पनवेल महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षिकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात आले होते. याला पनवेल कार्यक्षेत्रातून चांगला प्रतिसाद लाभला. दिवसभरात एकूण 475 शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले.

पनवेल कार्यक्षेत्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. सध्या शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षकांचे लसीकरण होणे महत्वाचे असल्याने वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गशर्नखाली लसीकरण टीम यासाठी प्रयत्न करत आहे.

तसेच पालिका हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागातही सहा लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून लसींच्या उपलब्धीनुसार दैनंदिन होणारे लसीकरण देखील वाढविले आहे. याबाबतीत रोज विक्रमी लसीकरण करण्यांवर पालिका भर देत आहे. 16 ऑगस्टला आजवरचे सर्वात जास्त 5 हजार 202 लसीकरण झाले.

संबंधित बातम्या :

ईडीची कारवाई, सीआयडीची हाताची घडी, कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना पैशांची प्रतीक्षा

प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत, पनवेल महापालिकेच्या कराबाबत नगर विकास मंत्री आठवड्याभरात निर्णय घेणार

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.