नाशिकच्या पवित्रभूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तरुणांना सल्ला; ‘या’ क्षेत्रात येण्याचं केलं आवाहन

आज भारत जगातील टॉप फाईव्ह इकॉनॉमित आहे. यामागे भारतातील तरुणांची ताकद आहे. भारत आज जगातील टॉप थ्री स्टार्टप इको सिस्टिममध्ये आला आहे. त्यात तरुणांची ताकद आहे. भारत जगातील मॅन्युफॅक्चरींग हब बनत आहे, त्याचा आधार भारतातील तरुण आहे. भारतातील तरुणांचं सामर्थ्य आहे. काळ प्रत्येकाला त्याच्या जीवन काळात एक संधी देत असतो. भारताच्या तरुणांना ही संधी आहे. हा अमृत काळाचा कालखंड आहे. आज तुमच्याकडे इतिहास घडवण्याची संधी आहे. इतिहासात आपल्या नावाची नोंद करण्याची संधी आहे.

नाशिकच्या पवित्रभूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तरुणांना सल्ला; 'या' क्षेत्रात येण्याचं केलं आवाहन
pm narendra modi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 2:13 PM

नाशिक | 12 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या पवित्र भूमीतून देशातील तरुणांना महत्त्वाचा आणि मोठा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही राजकारणात आला तर घराणेशाहीचा प्रभाव रोखता येईल, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जे तरुण मतदान करणार आहेत, त्यांनी तात्काळ मतदार यादीत आपली नोंदणी करून घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना हा सल्ला दिला आहे. मी जेव्हा ग्लोबल लीडर्स किंवा इनोव्हेटरला भेटतो तेव्हा त्यांच्यात मला अद्भूत आशा दिसते. त्याचं कारण लोकशाही आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरुणांची भागिदारी जेवढी अधिक असेल तेवढं देशाचं भवितव्य अधिक चांगलं असेल. या भागीदारीचे अनेक प्रकार आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तरच देश पुढे जाईल

तुम्ही सक्रिय राजकारणात आला तर घराणेशाहीचा प्रभाव कमी कराल. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं किती नुकसान केलं हे तुम्हाला माहीत आहे. लोकशाहीत आणखी एक पद्धत आहे. तुम्ही तुमचं मत मतदानातून व्यक्त करू शकता. अनेक तरुण पहिल्यांदाच मतदान करणारे असतील. पहिल्यांदा मतदान करणारे तरुण आपल्या देशात नवी ऊर्जा निर्माण करू शकतात. त्यामुळे मतदान यादीत तुमचं नाव येण्यासाठी आताच प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्यासाठी हा अमृत काळ कर्तव्य काळ आहे. तुम्ही कर्तव्य पार पाडलं तर समाज पुढे जाईल. देश पुढे जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी

मराठीत भाषणाची सुरुवात

आजचा दिवस युवाशक्तीचा दिवस आहे. गुलामीच्या कालखंडात भारताला नव्या ऊर्जेने भारलं होतं. त्या महापुरुषाचा आजचा दिवस आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आपण इथे जमलो आहोत. आजच जिजाऊंचीही जयंती आहे. जिजाऊ या नारीशक्तीचं प्रतिक होत्या. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनीनिमित्त मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत यायची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असं त्यांनी मराठीत भाषण करत म्हटलं.

मंदिराची स्वच्छता करा

भारताच्या अनेक महान विभूतींचा महाराष्ट्राच्या धरतीशी राहिला आहे. हा काही योगायोग नाही. या पुण्य आणि वीरभूमीचा आणि तपोभूमीचा हा प्रभाव आहे. या धरतीवर राजमाता जिजाऊं माँ साहेबांनी शिवाजी महाराजांना घडवलं. रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, सावरकर, टिळक, चाफेकर बंधू आदी सुपत्र याच भूमीने दिले. नाशिकच्या पंचवटीत प्रभू रामाने बराच काळ घालवला होता. मी आज या भूमीला नमन करतो. 22 जानेवारीपर्यंत आपण सर्व देशाच्या तीर्थस्थानांची मंदिरांची साफसफाई करू. स्वच्छतेचं अभियान करू. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विवेकानंदांचे विचार प्रेरणादायी

राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातील सर्व मंदिरात स्वच्छता अभियान चालवा. आपलं श्रमदान करा. आपल्या देशाचे ऋषि मूनी आणि संतापासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी युवा शक्तीला सर्वोच्च ठेवलं आहे. जर भारताला आपलं लक्ष पूर्ण करायचं असेल तर भारताच्या तरुणांना स्वतंत्र विचाराने पुढे गेलं पाहिजे, असं स्वामी अरविंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदही म्हणायचे की, भारताची आशा तरुणांचं चरित्र आणि त्यांच्या बौद्धिकतेवर टिकून आहे. अरविंद आणि विवेकानंदांचं मार्गदर्शन 2024मध्ये भारताच्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा आहे, असं मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.