AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव..’ शिवसेना खासदाराने गणेश नाईक यांच्यावर पर्सनल मनाला लागेल असे शब्द वापरले

आज नवी मुंबईत उद्घाटन कार्यक्रम झाले. या कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं. त्यांना निमंत्रित केलं नव्हतं. हा वाद आता चांगलाच तापला आहे. शिवसेनेच्या खासदाराने गणेश नाईक यांच्यावर व्यक्तीगत पातळीवरची टीका केली आहे.

'जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव..' शिवसेना खासदाराने गणेश नाईक यांच्यावर पर्सनल मनाला लागेल असे शब्द वापरले
Ganesh naik-Eknath Shinde
| Updated on: Jun 15, 2026 | 2:49 PM
Share

आज नवी मुंबईत आरोग्य सुविधांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात येते. मात्र, तरीही या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांची नावं होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. आज कार्यक्रम स्थळी शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. आता शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्यावर घणाघाती शाब्दीक हल्ला चढवला आहे. अगदी व्यक्तीगत पातळीवरची टीका केली आहे.

“जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव देऊ शकत नाहीत, ते काय कोणाचे नाव पुसणार?. निमंत्रण पत्रिकेच्या कागदावर नाव वगळू शकाल, पण स्वत:च्या कामाने लोकांच्या काळजावर कोरलेलं नाव कसे वगळाल?” असा सवाल खासदार ज्योती वाघमारे यांनी विचारला. “एखाद्या व्यक्तीची जलन, द्वेष, कोती मनोवृत्ती यातून हे प्रकार घडतात. हा त्यांच्या चिंधी मानसिकतेचा पुरावा आहे. आतापर्यंत तुम्ही काय नाव कमावलत? तुम्ही महिलांचे शोषण करून आणि नवी मुंबईचे डोंगर पोखरून बदनाम झालात” असा आरोप ज्योती वाघमारे यांनी केला.

ज्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे

“कधी तुमची घराणेशाही, हुकूमशाही लोकांवर लादून तर कधी स्वत:च्या संपत्तीचं निलाजरं प्रदर्शन करुन व्हाईट हाऊस बांधून तुम्ही फक्त बदनाम होण्याची काम केलीत. नाव कमावणं काय असतं, जनतेचा आशिर्वाद घेणं काय असतं हे तुम्हाला काय कळणार?. आतापर्यंत तुम्ही अशी कामं केलीत, ज्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

तुम जलन बरकरार रखना

“मग कोणता माज आहे तुम्हाला, त्यामुळे अशा प्रकारे निमंत्रण पत्रिकेवर नाव न घालून कोणाच्या कतृर्त्वाची उंची कमी होत नसते. तुमच्या सारख्या सत्तांध, कोत्या आणि विकृत मानसिकतेचं प्रदर्शन होत असतं. तमाम शिवसैनिकांच्या वतीने एवढेच सांगेन तुम जलन बरकरार रखना, एकनाथ शिंदे साहेब जलवे बरकरार रखेंगे!” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

Follow Us
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
Pune Mordern School First Day | शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव! उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत