AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झाडाजवळ वाद झाला… सर्वजण निघाले… तो बोलतही नव्हता, पाणीही पीत नव्हता… त्या घटनेने पुणे हादरलं

पुण्यातील राजगड तालुक्यात मित्रांच्या किरकोळ वादातून धक्कादायक घटना घडली आहे. 18 वर्षीय विकास जाधव याचा 15 वर्षीय अल्पवयीन मित्राने गळा आवळून खून केला. आंब्याच्या झाडाजवळ झालेल्या वादानंतर विकास बोलत नव्हता आणि त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, या घटनेने पुणे हादरले आहे.

झाडाजवळ वाद झाला... सर्वजण निघाले... तो बोलतही नव्हता, पाणीही पीत नव्हता... त्या घटनेने पुणे हादरलं
त्या घटनेनं पुणं हादरलं
| Updated on: Jun 15, 2026 | 2:36 PM
Share

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मित्रांमध्ये किरकोळ वादातून भांडण झालं होतं. वाद मिटलाही होता. सर्वजण निघूनही गेले होते. पण पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून एकाने दुसऱ्याचा गळाच आवळला. त्यामुळे 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. एका 15 वर्षीय मुलाने त्याचा गळा दाबून खून केला. पुण्याच्या राजगड तालुक्यातील मालवली गावात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे..

विकास सुरेश जाधव (वय 18, रा. मालवली, ता. राजगड) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार (वय 23) यांनी राजगडच्या वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ताडीच्या नशेत अल्पवयीन मुलाकडून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास मालवली येथील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळील आंब्याच्या झाडाजवळ काही युवकांमध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवून सर्वजण निघाले. मात्र, कोंढवली फाट्यानंतर आरोपीने पुन्हा मोटारसायकल मैदानाजवळ नेण्यास सांगितले. त्यानंतर विकास जाधव आणि आरोपी यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने विकासचा गळा जोरात दाबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दोघांना वेगळे केलं, पण…

घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी दोघांना वेगळे केले. मात्र, त्यानंतर विकास बोलत नव्हता तसेच पाणीही पीत नव्हता. त्यामुळे त्याला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. मृतदेहाचा पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी