VIDEO | कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू, मृतदेहांचा शोध सुरु

पडघा गावातील तीन तरुण काल कासाडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीत उड्या मारतानाचा तिघांचाही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO | कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू, मृतदेहांचा शोध सुरु
कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू, मृतदेहांचा शोध सुरु

पनवेल : तळोजा येथील कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दु्र्दैवी घटना घडली आहे. मयत तरुण पडघा गावातील रहिवासी असून प्रल्हाद भरत ठाकूर, भाऊ नामा बन्सारी अशी दोघांची नावे आहेत. बुडालेल्या तरुणांचे मृतदेह अद्याप मिळाले नाहीत. अग्नीशमन विभागाकडून शोध मोहिम सुरु आहे. (The search for the bodies of the two who went for a swim in the Kasadi River began)

नदीत उड्या मारतानाचा व्हिडिओ व्हायरल

पडघा गावातील तीन तरुण काल कासाडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीत उड्या मारतानाचा तिघांचाही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र गेले दोन-तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी तुंबडी भरुन वाहत आहे. यामुळे पोहायला गेलेले दोन तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून लागले. यापैकी एक जण सुदैवाने बचावला असून दोघांचा बुडून मृत्यू झाला. अग्नीशमन दल आणि गावकरी तरुणांच्या मृतदेहांचा शोध घेत आहेत.

औरंगाबादमध्येही तीन दिवसात तिघांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ शंकर पदमाने असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. औरंगाबाद येथे 18 जुलै रोजी सातारा डोंगरात ट्रेकिंक करायला एकूण सात मित्र गेले होते. हे सातही जण डोंगर परिसरातील तलावात गेले होते. मात्र, यावेळी तलावात बुडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेत इतर सहा जण सुदैवाने बचावले होते. लखन ईश्वर पवार वय-19 (रा.शिव शंकर कॉलोनी,औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर याच दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

धबधबे प्रवाहित झाल्याने तरुणाईचा पिकनिककडे कल

सध्या राज्यात बहुतांश ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे तलाव, नद्या, ओढे, भरुन वाहत आहेत. तसेच अनेक ठिकाणचे धबधबेसुद्धा वाहू लागले आहेत. याच कारणामुळे पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी तसेच पर्यटनासाठी तरुण मंडळी नदी, धबधबे अशा ठिकाणी फिरायला जात आहेत. यादरम्यान, पोहताना किंवा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना सध्या विविध ठिकाणी घडत आहेत. (The search for the bodies of the two who went for a swim in the Kasadi River began)

इतर बातम्या

Scholarship Examination : 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?

मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत नेणार का?, अदानी समूहाकडून मोठा खुलासा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI