मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत नेणार का?, अदानी समूहाकडून मोठा खुलासा

कंपनीकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'च्या (AAHL) एएएचएलचे मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यासंदर्भात आता अदानी ग्रुपनं खुलासा केलाय.

मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत नेणार का?, अदानी समूहाकडून मोठा खुलासा
मुंबई विमानतळ

मुंबईः मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी समूहाच्या ताब्यात आहे. त्याच दरम्यान कंपनीकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (AAHL) एएएचएलचे म्हणजे मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यासंदर्भात आता अदानी ग्रुपनं खुलासा केलाय.

मुंबई विमानतळ मुख्यालय अहमदाबादमध्ये जाणार?

मुंबई विमानतळ मुख्यालय अहमदाबादमध्ये जाईल, अशा अफवांच्या बातम्या प्रसारित झाल्यात. आम्ही निःसंशयपणे सांगू शकतो की, एमआयएएल आणि एनएमआयएएल दोन्ही विमानतळांची मुख्यालयं मुंबईत राहणार आहेत. आम्ही विमानतळ इकोसिस्टमच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण करण्याच्या आपल्या बांधिलकीवर ठाम असल्याचाही अदानी समूहानं पुनरुच्चार केलाय.

मुंबई विमानतळाचा कारभार अदानी समूहाच्या हाती

गेल्या काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हाती घेतला होता. गौतम अदानी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला होता. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.

देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाकडे

देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेलाय. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते. त्यानंतर आता मुंबई हे अदानी समूहाच्या अखत्यारित असलेले चौथे विमानतळ आहे. यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जातेय.

संबंधित बातम्या

‘महाराजा’साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे सिडको घेराव आंदोलन

Will Mumbai Airport be shifted to Ahmedabad ?, big revelation from Adani Group

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI