औरंगाबादेत आणखी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तीन दिवसांतील तिसरी घटना

औरंगाबाद शहरात पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत. आज (20 जुलै) औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तीन दिवसांतील तिसरी घटना
पाझर तलावाचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 7:51 PM

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आज (20 जुलै) औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ शंकर पदमाने असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. वैद्यकीय औषधी विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र मृत युवकाच्या खिशात आढळले आहे. (young man drowned in aurangabad harsul lake)

बुडालेला युवक औषधी विभागात नोकरीला

मिळालेल्या माहितीनुसार सौरभ शंकर पदमाने नावाचा एक तरुण शहरातील हर्सूल तलावाजवळ गेला होता. यावेळी तो पाण्यात बुडाला. ही घटना समजताच या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शहरातील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या युवकाला तलावाच्या बाहेर काढले. वैद्यकीय औषधी विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र मृत युवकाच्या खिशात आढळले आहेत. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी या युवकास मृत घोषित केले.

पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची तिसरी घटना

सध्या औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे तलाव, नद्या, ओढे, भरले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे धबधबेसुद्धा वाहू लागले आहेत. याच कारणामुळे हिरवाई पाहण्यासाठी तसेच पर्यटनासाठी शहरातील अनेक तरुण फिरायला जात आहेत. यादरम्यान, पोहताना तेसच इतर कारणांमुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना औरंगाबादमध्ये मागील काही दिवसांपासून घडत आहेत.

औरंगाबादेत 18 जुलै रोजी दोघांचा मृत्यू

औरंगाबाद येथे 18 जुलै रोजी सातारा डोंगरात ट्रेकिंक करायला एकूण सात मित्र गेले होते. हे सातही जण डोंगर परिसरातील तलावात गेले होते. मात्र, यावेळी तलावात बुडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेत इतर सहा जण सुदैवाने बचावले होते. लखन ईश्वर पवार वय-19 (रा.शिव शंकर कॉलोनी,औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर याच दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. आदिल शेख असे या मुलाचे नाव असून केंब्रिज जवळच्या डोहात ही घडना घडली होती. आदिल शेख हा सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली होती. मात्र, मदतीस उशीर झाल्याने या मुलाने प्राण सोडला होता.

इतर बातम्या :

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

Video : औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग, आगीत कारखान्याचं मोठं नुकसान

7 दिवसांची मेहनत, 9 फुटांची रांगोळी, औरंगाबादच्या आसावरीने साकारला हुबेहूब विठ्ठल

(young man drowned in aurangabad harsul lake)

Non Stop LIVE Update
अख्ख्या समाजाची छी थू झालीय, का घाबरताय...,' काय म्हणाले अजय महाराज
अख्ख्या समाजाची छी थू झालीय, का घाबरताय...,' काय म्हणाले अजय महाराज.
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?.
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?.
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख.
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?.
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट.
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले.
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार.
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी.