अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहू की नको?; उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ही टीका करतानाच त्यांनी संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सवालही केला आहे. तुम्हाला तुमच्या पिढ्या हुकूमशाहांच्या ताब्यात द्यायचा आहे काय? असा सवाल करतानाच ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते येथील सभेला संबोधित करत होते.

अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहू की नको?; उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 2:24 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रायगड | 1 फेब्रुवारी 2024 : रायगडच्या दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्रीपद आणि पंतप्रधानपदावरूनही भाष्य केलं आहे. ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार, असं आपल्या भाषणात जाहीरपणे म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्किल कोटी केली. अहो, मी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहू की नको असा प्रश्न मला पडलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी ही कोटी करताच सभेत एकच खसखस पिकलीय.

लोकसभा निवडणुका लागायला अजून उशीर आहे. पण त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक विधानसभेचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांची सभा पार पडली. या सभेतच अनंत गिते यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगून टाकलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हाच मुद्दा पकडून त्यावर मार्मिक शेरेबाजी केली.

तर देशाचा तुरुंग होईल

उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं अनंत गिते म्हणाले. अहो, मी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहू की नको? असा प्रश्न पडलाय. नाही नाही, मला असं काही स्वप्न पडत नाही. मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडलं नव्हतं. आणि पंतप्रधानपदाचं स्वप्न स्वप्नातही पडत नाही. मला फक्त दिसतोय तो देश आणि माझी भारतमाता. भारतमातेच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आपल्याला वाचवायचं आहे. मतं द्यायचं म्हणून द्यायचं नाही. तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी मतदान करायचं द्यायचं आहे. उद्या संपूर्ण देशाचा तुरुंग होईल. उद्या त्या वातावरणात तुमची मुलं जगावी वाटत नसेल तर त्यांना मतदान करा. नाही तर इंडिया आघाडी ही देशभक्तांची आघाडी आहे, आम्हाला मतदान करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

हुकूमशाहांच्या हाती पिढ्या देणार का?

या सभेत भाजप आणि संघाचे खबरे आले असतील. भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनाही माझं आवाहन आहे. तुम्ही त्यांच्या सतरंज्या उचलत आहात. पण तुम्ही आता तरी डोळे उघडा. ही लढाई केवळ भाजपविरुद्ध विरोधक अशी नाही. ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाी आहे. त्यामुळे आज तुम्ही कुणाच्या बाजूने उभे राहणार आहात? तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकूमशाहच्या हाती देणार आहात काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवकांना केला.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.