Maharashtra News Live Update : बारामतीला पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्याने मोठं नुकसान

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : बारामतीला पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्याने मोठं नुकसान
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्स
Image Credit source: tv9

| Edited By: दादासाहेब कारंडे

May 11, 2022 | 9:34 PM

मुंबई : आज बुधवार 11 मे 2022. आज आपण राजकारणासह सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 11 May 2022 08:41 PM (IST)

  राज्यमंत्री बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर

  रस्त्याच्या घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर

  कुठलाही आधार नसताना माझ्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले…

  कुठलेही पुरावे नाही सगळे काम बनवाबनवीचे झाले आहे..

  दाखल झालेले गुन्हे खारीज करण्यात यावे.आम्ही वरच्या न्यायालयात जाऊ…

  जामीना नंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया…

 • 11 May 2022 07:23 PM (IST)

  अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न

  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न ,

  जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजा समोर घडला प्रकार ,

  मोहम्मद अजरोदिन अस आत्मदहन करणाऱ्याचे नाव ,

  पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला ,

  सरकारी जमिन बेकायदेशीर विक्री केल्याची तक्रार करून ही कारवाई होत नसल्याने आत्मदहन केल्याचा खुलासा ,

  मोंढा पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात .

 • 11 May 2022 07:23 PM (IST)

  वादळी वाऱ्यामुळे बारामतीत झाडांची पडझड

  - बारामती शहरातील भिगवण रस्त्यासह विविध भागात झाडे पडली.. - जोरदार वादळामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड..

 • 11 May 2022 07:22 PM (IST)

  मुंब्रा पोलिसांनी खेळणी व्यापाऱ्याचे ६ कोटी लुटल्याचं प्रकरण

  मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी आणि ७ कर्मचारी निलंबित सूत्रांची माहिती

  तर एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची होणार खात्यांतर्गत चौकशी

  सर्व निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी

  परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त करणार चौकशी

 • 11 May 2022 05:12 PM (IST)

  वकील गुणरत्न सदावर्ते Live

  वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांकडून चौकशी

  आम्ही लवकरच अयोध्येला जाऊ

  राजकीय हेतूने आम्हाला नोटीस बजावली

  आम्ही कुणाला घाबरणार नाही

 • 11 May 2022 04:09 PM (IST)

  बांधकाम व्यावसायिक अनूज गोयल व अंकित गोयलवर गुन्हा दाखल

  9 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अनूज गोयल व अंकित गोयलवर गुन्हा दाखल

  बांधकामाचं कंत्राट दिलेल्या महिलेनं पोलिसांत दिली तक्रार

  काम करूनही 9 कोटी रुपयांच बिल थकवल्याची केली तक्रार

  कोंढवा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय

  स्वाती पाटील यांनी गोयल बंधूविरोधात तक्रार दिली होती

  मात्र या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती प्राप्त आहे

  कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांची माहिती ..

 • 11 May 2022 04:09 PM (IST)

  पुण्यात उद्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

  दिवसभर पाणीपुरवठा बंद पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागेल

  13 तारखेला सकाळी उशीरा व कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

  घोरपडी, डिफेन्स, कँम्प , सोमवार पेठ, जूना बाजार, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन, पाटील इस्टेट,शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ रस्ता

  या भागात राहणार पाणीपुरवठा बंद राहणार

 • 11 May 2022 03:44 PM (IST)

  अमरावतीत राणा दाम्पत्याच्या मतदारसंघात शिवसेना करणार महाआरती

  खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिल्लीत काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपुर्वी हनुमान मंदिरात महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केले, राणा दाम्पत्याच्या या आव्हानाला प्रतिआव्हान अमरावतीच्या शिवसैनिकांनी दिले आहे, अमरावती जिल्ह्याच्या विकासावर लक्ष न देता पेट्रोल डिझेल व गॅसच्या वाढलेल्या दरावर केंद्र सरकारवर चकार शब्दही न बोलनाऱ्या आमदार खासदार जोडीला सद्बुद्धी मिळण्यासाठी शिवसेना अमरावती महानगराच्या वतीने अमरावती येथील जागृत पांढरी हनुमान मंदिर येथे 14 मे रोजी सकाळी 9 वाजता महाआरती करण्यात येणार अशी माहिती शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिली.

 • 11 May 2022 03:22 PM (IST)

  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर Live

  प्रसिद्धीच्या हव्यासात लोकप्रतिनिधी काहीही बडबड करत आहेत

  या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावं

 • 11 May 2022 03:08 PM (IST)

  मालेगाव तालुक्यातील घटना

  बिबट्याचे बच्छडे शेतकरी कुटुंबात आठवडाभर विसावले

  वाट चुकलेले बिबट्याचे बच्छडे तब्बल आठवडाभर एका शेतकरी कुटुंबात...

  मादी परत न आल्याने वनविभागाच्या स्वाधीन..

  ते बछडे वनविभागाच्या स्वाधीन करतांना शेतकरी कुटूंबाला देखील गहिवरून आले.

 • 11 May 2022 03:08 PM (IST)

  भाजप खासदार बृजभूषण सिंह राज ठाकरेंच्या विरोधात आक्रमक

  - राज ठाकरेंना 2008 पासून शोधत आहे, मात्र राज ठाकरे मुंबईबाहेर पडत नाहीत,

  - राज ठाकरे येणारच नसल्यामुळे भाजप खासदार लल्लू सिंह यांना स्वागत करण्याचा प्रश्नच उदभवत नाही,

  - बृजभूषण सिंह यांचे लल्लू यांना प्रत्युत्तर,

 • 11 May 2022 03:07 PM (IST)

  विरारमध्ये नव्याने मांडवी पोलीस ठाणे आजपासून सुरू

  महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते नव्या मांडवी पोलीस ठाण्याचे उदघाटन करण्यात आले आहे.

  या पोलीस ठाण्यात 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 क्राईम पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4 पोलीस उपनिरीक्षक, 53 पोलीस अंमलदार याची नियुक्ती केली आहे.

  वसई विरार नालासोपारा परिसरात आता एकूण 10 पोलीस ठाणे कार्यरत झाले आहेत.

  मुंबई अहमदाबाद महामार्ग लगतच पेल्हार आणि मांडवी हे दोन पोलीस ठाणे झाल्याने महामार्गावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

  पोलीस, जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सामाजिक सलोखा राखून, गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांनी काम करावे असे आदेशही यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी उदघाटन प्रसंगी दिले आहेत.

 • 11 May 2022 03:06 PM (IST)

  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त आक्रमक

  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कायमस्वरूपी महापूर येऊ नये यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या हे स्पष्ट करावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

  शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीने केली उच्च न्यायालयात याचिका दाखल

  न्यायालयातील याचिकेबरोबरच रस्त्यावरची लढाई लढण्याचा पुरग्रस्तांचा इशारा

  पूरग्रस्त अन्याय निवारण समितीने पत्रकार परिषदेत दिली माहिती

 • 11 May 2022 02:05 PM (IST)

  मुंबई महापालिका भ्रष्टाचाराची लंका, किती त्रास दिला तरी घाबरणार नाही, नवनीत राणांचा इशारा

  मुंबई महापालिका भ्रष्टाचाराची लंका

  राजद्रोहाचं कलम इंग्रजांनी आणलं होतं

  हेच राजद्रोहाचं कलम आमच्यावर लावण्यात आलं

  मुंबईत अनिल परब, संजय राऊतांचे 10-15 फ्लॅट, माझा फक्त एकच फ्लॅट

  मुंबई पालिकेत भ्रष्टाचार करून कोट्यावधींची संपत्ती कमवता

  मागासवर्गीय महिलेला जेलमध्ये पाठवून नामर्दासारखं काम

  रवी राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

  14 मे रोजी दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती करणार

  राजद्रोह लावण्यात आलेली महाराष्ट्रात मी पहिलीच खासदार

  किती त्रास दिला तरी घाबरणार नाही, नवनीत राणांचा इशारा

  उद्धव ठाकरेंनी निवडणूक कोठून लढणार हे 14 तारखेला जाहीर करावं

  नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 • 11 May 2022 02:03 PM (IST)

  राष्ट्रवादीकडून कुरघोडी करण्याचं कायम, नाना पटोलेंचा आरोप

  राष्ट्रवादीकडून कुरघोडी करण्याचं कायम

  काँग्रेस नेते  नाना पटोलेंचा आरोप

  मैत्री प्रामाणिकपणे निभवा

 • 11 May 2022 01:39 PM (IST)

  MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 161 पदांसाठी जाहिरात

  एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

  गट अ आणि गट ब संवर्गाची 161 पदांसाठी काढली जाहिरात

  21 ऑगस्टला होणार पूर्व परीक्षा

  एमपीएससीनं जाहीरात केली प्रसिद्ध

  आयोगाचं ट्विट

 • 11 May 2022 01:17 PM (IST)

  मनसे नेते बाळा नांदगावकरांना धमक्यांचं पत्र

  मनसे नेते बाळा नांदगावकरांना धमक्यांचे पत्र

  राज ठाकरेंनाही धमक्यांचे पत्र

  राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

  नांदगावकरांच्या लालबागमधील कार्यालयात धमक्यांचे पत्र

  राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

 • 11 May 2022 11:58 AM (IST)

  आघाडीत बिघाडी! राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचं काम, जाब विचारणार, नाना पटोले भडकले

  राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचं काम

  काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं ट्विट

  'मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!'

 • 11 May 2022 11:48 AM (IST)

  देशद्रोह कायद्याबाबत नवा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

  देशद्रोह कायद्याबाबत नवा विचार करा

  सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

  या पूर्वीचे खटले सुरूच राहतील मात्र 124 अ अंतर्गत नवीन गुन्हे दाखल होणार नाहीत

  यापुढे केंद्र आणि राज्य सरकारला नवीन खटले दाखल करता येणार नाही

 • 11 May 2022 11:46 AM (IST)

  छत्रपती संभाजीराजेंनी पक्ष काढावा, कार्यकर्त्यांची मागणी

  छत्रपती संभाजीराजेंनी पक्ष काढावा

  कार्यकर्त्यांची टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून संभाजीराजेंकडे मागणी

  आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतोय राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे हा एक पर्याय आहेत

  त्यांनी उद्या पक्षाची घोषणा करावी

  छत्रपती संभाजीराजेंना पक्ष काढण्याची मागणी वाढली

  उद्या पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे करणार भूमिका जाहीर

  मराठा समाजाचे प्रश्न सोडवतो असं सरकार म्हणतंय मात्र करत काही नाही

  त्यांनी पक्षाची घोषणा करावी

 • 11 May 2022 10:18 AM (IST)

  मोतीलाल ओसवालकडून सोमय्यांना मोठ्या देणग्या, शिवसेना नेते संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

  किरीट सोमय्यांसह भाजपच्या 28 नेत्यांची प्रकरणं उघड करणार

  मोतीलाल ओसवालकडून सोमय्यांना मोठ्या देणग्या

  शिवसेना नेते संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

  सोमय्यांचं युवक प्रतिष्ठान काळा पैसा पांढरा करणारी संस्था

 • 11 May 2022 10:01 AM (IST)

  सगळ्यांनीच भारतभ्रमण करावं, सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

  सगळ्यांनीच भारतभ्रमण करावं, सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

  भारत एक खोज प्रमाणे सगळ्यांनीच फिरायला हवंय- सुप्रिया सुळे

  सुप्रिया सुळेंनी घेतली पुणे पालिका आयुक्तांची भेट

 • 11 May 2022 09:45 AM (IST)

  यासीन मलिक आणि नवाब मलिक यांचं नातं काय? मोहित कंबोज यांचा ट्विटरवरून सवाल

  यासीन मलिक आणि नवाब मलिक यांचं नातं काय?

  मोहित कंबोज यांचा ट्विटरवरून सवाल

  'Yasin Malik And Nawab Malik Relations Should Be Investigated ! यासीन मलिक और नवाब मलिक के रिश्तों की जाँच होनी चाहिए ! यासीन मलिक आणि जेलमध्ये असणारे महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे नात काय यांची चौकशी होणे गरजेचे आहे…चौकशी करा नेमके यह रिश्ता क्या कहता है !'

 • 11 May 2022 09:39 AM (IST)

  केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

  केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

  संध्याकाळी 5 वाजता होणार बैठक

 • 11 May 2022 09:30 AM (IST)

  मलिकांवर UAPA लागू करण्याची कंबोज यांची मागणी

  मलिकांवर UAPA लागू करण्याची कंबोज यांची मागणी

  भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत केली मागणी

  'UAPA नवाब मलिक आणि कुटुंबावर लागू केला पाहिजे कारण ते थेट दहशतवादी निधी आणि अंडरवर्ल्डशी संबंधांमध्ये गुंतलेले आहेत!'

 • 11 May 2022 09:17 AM (IST)

  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज बेळगाव दौऱ्यावर

  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज बेळगाव दौऱ्यावर

  मराठा को ऑपरेव्ह बँकेचा आज अमृत महोत्सव

  दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाला लावणार हजेरी

  मराठा को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात होणार सुरूवात

  बेळगाव महानगरपालिकेतील महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बेळगावमध्ये

 • 11 May 2022 09:05 AM (IST)

  जवान सुधीर निकम यांना वीरमरण

  जवान सुधीर निकम यांना वीरमरण

  'निकम कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी'

  खासदार अमोल कोल्हेंची फेसबुक पोस्ट

  'अपशिंगे (सातारा) गावचे जवान सुधीर निकम यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली! 1995 साली त्यांचे वडील सूर्यकांत निकम यांनीही देशासाठी प्राण गमावले होते. आधी वडील व आता मुलगा गमावलेल्या निकम कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.'

 • 11 May 2022 08:23 AM (IST)

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये

  पिंपरी चिंचवड

  -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शहरात

  -राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरी मध्ये राष्ट्रीय एकात्मता मेळावा तसेच जशने ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय

  -हिंदू,मुस्लिम, शीख,ख्रिश्चन, बौद्ध धर्मातील शहरातील प्रमुख धनगरांना या कार्यक्रमांसाठी निमंत्रित करण्यात आलंय

 • 11 May 2022 08:22 AM (IST)

  सरसंघचालक मोहन भागवत यांचा खामगावमध्ये तीन दिवस मुक्काम

  सरसंघचालक मोहन भागवत यांचा खामगावमध्ये तीन दिवस मुक्काम

  आरएसएसचा पश्चिम क्षेत्राचा द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला 8 मे पासून प्रारंभ

  सरसंघचालक तीन दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत

  या वर्गाला गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र मधून 183 विद्यार्थी सहभागी झाले

  भागवत यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने मेहता विद्यालयाला छावणीचे स्वरूप

 • 11 May 2022 08:20 AM (IST)

  उद्या संभाजीराजेंची पत्रकार परिषद

  खासदार संभाजीराजेंची उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद

  हॉटेल रॅमी ग्रँंड आपटे रोड या ठिकाणी होणार पत्रकार परिषद

  उद्या पुण्यात संभाजीराजेंच्या समर्थनार्थ राज्यभरातून कार्यकर्ते येण्याची शक्यता

  उद्या शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता

  सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेतून मांडणार भूमिका

  संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सगळ्यांच लक्ष

 • 11 May 2022 08:11 AM (IST)

  संजय राऊतांनी पुन्हा सोमय्यांना डिवचलं, 5600 कोटी शेअर्स घोटाळ्याप्रकरणी ट्विट

  संजय राऊतांनी सोमय्यांना पुन्हा डिवचलं

  5600 कोटी शेअर्स घोटाळ्याप्रकरणी ट्विट

 • 11 May 2022 08:01 AM (IST)

  कोल्हापुरात रोखला बालविवाह

  कोल्हापुरात सामाजिक संस्थेनं रोखला बालविवाह

  राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथं सुरू होता बालविवाहाचा प्रकार

  अवनी सामाजिक संस्थेनं पोलिसांच्या मदतीने बालविवाहाचा प्रयत्न हाणून पाडला

  अल्पवयीन मुलीचं नात्यातीलच मुलाशी लग्नाचा होता घाट

  अवनी संस्थेकडून जागर प्रकल्पांतर्गत सुरू आहे बालविवाह रोखण्याची मोहीम

 • 11 May 2022 08:00 AM (IST)

  हद्दपार केलेल्या मनसैनिकांना न्यायालयाचा दिलासा

  नाशिक - भोंगे आंदोलन प्रकरणी पोलिसांनी हद्दपार केलेल्या मनसैनिकांना न्यायालयाचा दिलासा

  अनेक मनसे पदाधिकाऱ्यांच्या हद्दपारीला न्यायालयाने दिला स्टे

  भोंगे विरोधातील आंदोलनात मनसे कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात

  तर अनेकांना दिली होती थेट हद्दपारीची नोटीस

 • 11 May 2022 07:59 AM (IST)

  नवी मुंबई मेट्रो लवकरच धावणार

  सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी नवी मुंबई मेट्रो हा एक प्रकल्प आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून अत्यावश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याने नवी मुंबईत लवकरच मेट्रो धावणार आहे. त्यादृष्टीने उद्घाटनासाठी सिडको प्रशासनाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तशी वेळ देखील मागितली आहे. अशी माहिती सूत्रांकडून समजली जाते. सिडकोने बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम 2011 मध्ये सुरू केले. मात्र त्यात अनेक विघ्ने आल्याने काम रखडले होते.

 • 11 May 2022 07:32 AM (IST)

  चार मित्रांवर काळाचा घाला, मनमाडमध्ये भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

  मनमाड येथील चार मित्रांवर काळाचा घाला

  कार झाडावर आदळून भीषण अपघात

  4 जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

 • 11 May 2022 07:24 AM (IST)

  नागपूर रेल्वे स्थानकातील स्फोटकाच्या बॅगचं गूढ वाढलं

  - नागपूर रेल्वेस्थानकात स्फोटकं आढळल्यानंतर 24 तास उलटूनही सुगावा नाही

  - रेल्वेस्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच अतिशय पुसट हालचाली टिपल्याने अडचण

  - सोमवारी सायंकाळी रेल्वेस्टेशन परिसरात बॅगमध्ये डिटोनेटर कांड्या आढळून आल्या होत्या

  - या प्रकरणाच्या तपासासाठी शहर पोलीस तसेच गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे

 • 11 May 2022 07:17 AM (IST)

  सहा जिल्ह्यात 200 होमगार्डना देण्यात येणार प्रशिक्षण

  राज्यातील आपत्ती प्रवण सहा जिल्ह्यात 200 होमगार्डना देण्यात येणार प्रशिक्षण

  पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा,रत्नागिरी ,रायगड या सहा जिल्ह्यात अतिवृष्टी, भुस्खलन, पुरपरिस्थिती निर्माण होते या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  नागरी संरक्षण दल व होमगार्ड एकत्रित आपत्ती काळात काम करतील

  20 मे पर्यंत हे प्रशिक्षण पुर्ण केलं जाणार आहे

  जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे प्रशिक्षण देतील

 • 11 May 2022 07:16 AM (IST)

  पुणे विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 120 व्या पदवीप्रदान समारंभाचं उद्या आयोजन

  संध्याकाळी 5 वाजता विद्यापीठाच्या हिरवळीवर समारंभाचं आयोजन करण्यात आलंय

  शैक्षणिक वर्ष एप्रिल / मे 2021 या वर्षातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएचडी, एमफील, स्तरावरील एकूण 1 लाख 18 हजार 222 विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत

  तर 309 पीएचडीधारकांचाही समावेश आहे

  या समारंभदारम्यान 75 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे

  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व नँकचे अध्यक्ष डॉ. भुषण पटवर्धन उपस्थित राहणार आहेत..

 • 11 May 2022 07:14 AM (IST)

  नागपूर प्रभागरचना 17 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार

  नागपूर मनपा निवडणूकीसाठी प्रभागात 17 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार

  - आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तीनचाच राहणार

  - प्रभागरचना बदलण्याच्या चर्चांना विराम

  - जून महिन्यात निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता

  - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक प्रक्रियेला गती

 • 11 May 2022 07:12 AM (IST)

  येरवडा कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज

  येरवडा कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज

  आतापर्यंत 222 पुरुष कैद्यांनी तर 8 महिला कैद्यांनीही केला कर्जासाठी अर्ज

  महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह बँकेकडून दिलं जाणार 50 हजार रुपयांच कर्ज

  राज्यातील पहिलीच अभिनव योजना सुरू करण्यात आलीये

  आतापर्यंत 230 अर्ज कर्जासाठी प्राप्त झालेत...

 • 11 May 2022 07:11 AM (IST)

  नागपुरातील मधुबन क्रेडिट सोसायटीत 8 कोटींचा घोटाळा

  - नागपूरातील मधुबन क्रेडिट सोसायटीत आठ कोटींचा घोटाळा

  - सतरंजीपूरा येथील मधुबन क्रेडिट सोसायटीने मुदत झाल्यानंतरंही ठेवीदारांचे पैसे परत केले नाही

  - नागपूर पोलिसांनी तब्बल 19 जणांविरोधात केला फसवणुकीचा गुन्हा दाखल

  - लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

 • 11 May 2022 07:02 AM (IST)

  MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 2019ची भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्याचे आदेश, राज्य सरकारचा मोठा निर्णय

  2019 ची भरती प्रक्रीया तत्काळ राबविण्याचे आदेश दिलेत

  काल राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रीया तत्काळ राबविण्याचे आदेश दिलेत

  गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती.

  मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडली होती.

  2019 ला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

 • 11 May 2022 06:54 AM (IST)

  राज्यातील शिक्षकांच्या बदलीसाठी अ‍ॅप, बदली प्रक्रियेत पारदर्शकतेचा प्रयत्न

  राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदलीचे अ‍ॅप तयार

  राज्य सरकारकडून अ‍ॅपची निर्मिती, बदली प्रक्रीयेत पारदर्शकता असावी यासाठी अ‍ॅपची निर्मिती करण्यात आलीये

  दोन दिवसात तांत्रिक चाचणी पुर्ण करून हे अ‍ॅप सुरू केलं जाणार आहे

  सुरुवातीला पुणे, सातारा आणि वर्धा या तीन जिल्ह्यातील झेडपी सीईओंची समिती पुन्हा एकदा स्थापन करण्यात आली आहे

 • 11 May 2022 06:51 AM (IST)

  तापमानाची दाहकता होणार कमी!

  प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या भारतीयांना पुढील आठवड्यापासून मिळणार दिलासा

  राजस्थान वगळता सर्वच राज्यात तापमानाची दाहकता होणार कमी

  14 तारखेपर्यंत दिल्ली, हरयाणा, पंजाब, व उत्तर प्रदेशात उष्णतेच्या झळा वाढतील

  मात्र महाराष्ट्रासह काही राज्यात तापमानात घट व्हायला सुरुवात होईल

  लवकरच मान्सून दाखल होण्याची चिन्ह

  हवामान अभ्यासकांचा अंदाज !

 • 11 May 2022 06:48 AM (IST)

  पुणे पालिकेतील नव्या 23 गावांचा पाणीप्रश्न, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

  पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांच्या पाणीप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

  बांधकाम व्यावसायिकांनी पत्र देऊन पाणी देण्याची केली मागणी

  न्यायालयाचे आदेश असतानाही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना मिळत नाही

  नुकतीचं 23 गावं ही महापालिकेत समाविष्ट करण्यात आलीत

  या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय

 • 11 May 2022 06:37 AM (IST)

  औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीवर आज हातोडा

  लेबर कॉलनीत सकाळी 9 वाजल्यापासून पाडापाडीला सुरुवात होणार

  पोलीस बंदोबस्तात लेबर कॉलनी होणार जमीनदोस्त

  लेबर कॉलनी परिसरात कलम 144 नुसार जमावबंदी लागू

  60 वर्षे जुन्या शासकीय लेबर कॉलनीवर खाजगी लोकांनी मिळवला होता ताबा

  नवीन शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी लेबर कॉलनी होतेय जमीनदोस्त

 • 11 May 2022 06:18 AM (IST)

  कठीण काळात श्रीलंकेच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहायला हवे, सामना अग्रलेख

  सामना अग्रलेख - श्रीलंकेतील पब्लिक क्राय !

  'हिंदी महासागरात घुसखोरी करण्यासाठी चीनने श्रीलंकेला जाळ्यात ओढून बटीक बनविण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानसह जगभरातील देशांनी चीनचा हा डाव उधळून लावतानाच या कठीण काळात श्रीलंकेच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहायला हवे. श्रीलंकेतील अराजकता संपविण्यासाठी इतिहासाची पुनरावृत्ती करावीच लागेल. श्रीलंकेत पुन्हा एकदा रामराज्य आणण्यासाठी हिंदुस्थानने पुढाकार घेतला पाहिजे!.

Published On - May 11,2022 6:16 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें