AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Siddique : शाहरुख- सलमानही त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत; कोण होते बाबा सिद्दीकी?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.

Baba Siddique : शाहरुख- सलमानही त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत; कोण होते बाबा सिद्दीकी?
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार
| Updated on: Oct 12, 2024 | 11:04 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. दसऱ्याच्या दिवशी , आज रात्रीच थोड्या वेळापूर्वी त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले, ज्यातील एक गोळ त्यांच्या छातीला लागली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आवे. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येत आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ?

बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. दरवर्षी त्यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. या पार्टीसाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सही शामिल होतात. शाहरूख खान, सलमान खान हेही आवर्जून सिद्दीकी यांच्या पार्टीत शामिल होतात. सलमान खान याचे बाबा सिद्दीकीशी जवळचे संबंध होते.

दरवर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीची सोशल मीडियावर मोठी चर्चा असते, फोटो, व्हिडीओ गाजत असतात. ज्यांच्या पार्टीसाठी स्टार्स आवर्जून येतात, असे हे बाबा सिद्दीकी नेमके आहे तरी कोण, त्यांचे नेटवर्थ किती आहे, हे सगळं जाणून घेऊया.

काँग्रेसच्या एका जुन्या नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी बॉलिवूडमध्येही लोकप्रिय होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते काँग्रेसशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी अनेक आंदोलनांतही सहभग घेतला होता. त्यांनी मुंबईतील एमएमके कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबांनी दोनदा नगरसेवक म्हणून काम पाहिले. यानंतर ते तीनवेळा काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेत आमदारही झाले.

बाबा सिद्दीकी नेटवर्थ

बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांचे नेटवर्थ 7.2 मिलियन इतके. पण त्यांच्या खऱ्या कमाईबाबत अधिकृत माहिती अज्ञात आहे. बाबा सिद्दीकी यांचे मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सशी चांगले संबंध होते. रमजान दरम्यान ते दरवर्षी खूप मोठी पार्टी द्यायचे.  त्यामध्ये बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटीदेखील सहभागी होत असत. मिळालेल्या माहितीनुसार, 2018 साली बाबा सिद्दीकी यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता, त्यामध्ये 462 कोटी संपत्ती असल्याचे समोर आले होते.

लग्झरी कारचाही शौक

बाबा सिद्दीकी यांना लग्झरी कार्सचीही आवड होती. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ S क्लास, बीएडब्ल्यू 7 सीरिज आणि रोल्स रॉयस फँटम कार होत्या.  तसेच त्यांच्या ताफ्यात आणखीही अनेक आलिशान गाड्या होत्या.

सलमानसोबत खास नातं

बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे खूप जवळचे नाते होतं. ते दोघंही अनेकदा एकत्र दिसले. अनेक समाजसेवेच्या कामातही सलमान बाबांसोबत दिसायचा. सलमान खान हा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर अनेक वादांमुळेही चर्चेत असतो. हिट अँड रन केस असो किंवा काळवीटाची शिकार, सलमानच्या अनेक कृत्यांनी खळबळ माजवली. याप्रकरणात सलमानला तुरूंगातही जावं लागलं होतं. जेव्हा जेव्हा सलमान अडचणीत सापडला, तेव्हा बाबा सिद्दीकी नेहमीच त्याच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याचे दिसले. त्याच्या प्रत्येक केसच्या सुनावणीदरम्यान बाबा सिद्दीकी कोर्टात हजर होते, किंवा ते सलमानच्या कुटुंबियांची मदत करताना दिसले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.