AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघातातील ढिगाऱ्यातून अपघाताची कारणे उलगडणार? DGCA करणार तपास

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला... याची सखोल चौकशी होईल तर, विमान अपघातातील ढिगाऱ्यातून अपघाताची कारणे कशा प्रकारे उलगडतील... हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघातातील ढिगाऱ्यातून अपघाताची कारणे उलगडणार? DGCA करणार तपास
अजित पवार
| Updated on: Jan 28, 2026 | 2:30 PM
Share

Ajit Pawar Plane Crash: राज्यातील राजकारण सुन्न झालं, जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची माहिती समोर आली. मंगळवारी सकाळी बातमी आली विमान अपघातात अजित पवार यांचं निधन आणि संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारं एक खाजगी विमान बारामती येथे उतरताना कोसळलं. रिपोर्टनुसार, धावपट्टीजवळ Learjet 45 विमानाचं नियंत्रण सुटलं आणि दादांचं दुर्दैवी निधन झालं. विमान अपघातापूर्वी जोरदार टक्कर आणि इंधन टाकीला आग लागली. आता विमान अपघातातील ढिगाऱ्यातून अपघाताची कारणं समोर येतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आहे. पण लँडिंग दरम्यान झालेला हा अपघात फक्त एक अपघात आहे की एखाद्या मोठ्या चुकीचा परिणाम आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), विमान वाहतूक तज्ज्ञ आणि तपास संस्था आता कसून चौकशी करण्याची तयारी करत आहेत. अवशेष आणि तांत्रिक पुराव्यांमधून काय सत्य बाहेर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कशी पुढे सरकणार चौकशी?

तपासाचा मुख्य केंद्रबिंदू अपघात स्थळ असेल. विमानाचे अवशेष, आघाताचे दृष्टीकोन, धावपट्टीपर्यंतचे अंतर आणि कोलणत्याही जळण्याच्या खुणा या सर्वांची काळजीपूर्वक नोंद केली जाईल.

अपघाताचा तपास तांत्रिक बाबींपर्यंत विस्तारला जाईल. ब्लॅक बॉक्स, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचा वापर उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांची माहिती सर्व गोष्टींची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

विमानात काही बिघाड झाले होते का? उड्डान भरण्यासाठी विमान पूर्णपणे सुरक्षित आहे का? अशा सर्व संभाव्य गोष्टींची चौकशी करण्यात येणार आहे. या सर्व मुद्द्यांवर कागदपत्रांची छाननी केली जाईल. तपास संस्थांना एटीसी आणि पायलटमधील संभाषणाचे अधिकृत रेकॉर्ड देखील उपलब्ध असेल.

अपघाताचं प्राथमिक कारण काय असावं?

सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते शेतात कोसळलं. अपघातात अजित दादा यांच्यासोबत असलेल्या लोकांचं देखील निधन झालं आहे.

ब्लॅक बॉक्समुळे कोणती माहिती समोर येईल?

ब्लॅक बॉक्स विमानाची तांत्रिक स्थिती, त्याचा वेग, उंची आणि वैमानिकांच्या अंतिम निर्णयांबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

वातावरणामुळे होऊ शकतो अपघात?

शक्यता नाकारता येत नाही. तपासात हवामान, वाऱ्याची दिशा, दृश्यमानता आणि धावपट्टीची स्थिती यासारख्या बाह्य घटकांचा देखील समावेश असेल.

तपासासाठी किती कालावधी लगू शकतो?

डीजीसीएचा प्राथमिक रिपोर्ट काही दिवसांत येऊ शकतो, तर सविस्तर तपासाला काही आठवडे लागू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, DGCA चे अधिकारी दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल.
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू.
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर.
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा.
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत.
बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी आणि जनाक्रोश
बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी आणि जनाक्रोश.
अजित पवारांचा अपघाती मृत्यू; राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर
अजित पवारांचा अपघाती मृत्यू; राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? पाहा संपूर्ण व्हिडीओ
अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? पाहा संपूर्ण व्हिडीओ.
अजित पवारांचा अपघाती मृत्यू, राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त
अजित पवारांचा अपघाती मृत्यू, राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त.
दिलदार मित्र सोडून गेला! मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या भावना
दिलदार मित्र सोडून गेला! मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या भावना.