AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला. | Jayant Patil

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील
शेतकऱ्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या कायद्यात केंद्र सरकारने दुरुस्ती करायला पाहिजे होती.
| Updated on: Jan 26, 2021 | 4:26 PM
Share

सांगली: भारताच्या प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील पोलीस शेतकऱ्यांवर (Farmers) लाठीमार करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेली ही वागणूक शेतकऱ्यांच्या कायम लक्षात राहील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी केले. लोकशाहीत लवचिकता ठेवावी लागते. मात्र, कोणतीही लवचिकता न ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आता शेतकरी अधिक त्वेषाने उठाव करुन आपल्या मागण्या मान्य करुन घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले. (Chaos in Delhi after Farmer Tractor Rally)

ते मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला. गेले अनेक दिवस भारतातील शेतकरी दिल्लीला गराडा घालून बसले होते. परंतु, सरकारने आडमुठेपणा दाखवत शेतकऱ्यांना दाद दिली नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. मात्र, दिल्लीत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

‘राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी’

दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आंदोलनामागे कोणती अदृश्य शक्ती राजकारण करत आहे?, असा सवाल करतानाच दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राजीनामा तो बनता है साहेब, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांचा रोख थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच दिशेने असल्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याची चर्चा आहे.

हिंसा हा पर्याय नाही- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या 7 लोककल्याण मार्गावरील सुरक्षाव्यवस्थेतही कमालीची वाढ करण्यात आल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

मग शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?; शेतकरी नेते टिकैत यांचा संतप्त सवाल

(Chaos in Delhi after Farmer Tractor Rally)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.