केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळच आली नसती: जयंत पाटील

केंद्र सरकारने अद्याप GST चे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे यंदा राज्याचा आर्थसंकल्प सादर करताना अडचण येणार आहे. | Jayant Patil

केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळच आली नसती: जयंत पाटील
शेतकऱ्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या कायद्यात केंद्र सरकारने दुरुस्ती करायला पाहिजे होती.
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 4:21 PM

रायगड: शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळ आलीच नसती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. शेतकऱ्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या कायद्यात केंद्र सरकारने दुरुस्ती करायला पाहिजे होती. मात्र, तसे न झाल्यामुळे ही वेळ आली, असे जयंत पाटील यांनी सांगितले. (Jayant Patil on farmers protest)

ते सोमवारी रायगडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाला आम्हा सर्वांचा पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच यावेळी जयंत पाटील यांनी जीएसटी थकबाकीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकारने अद्याप GST चे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे यंदा राज्याचा आर्थसंकल्प सादर करताना अडचण येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक राज्य भरडली जात आहेत. राज्य चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. आपलं दुकान कसे चालेल आणि इतर राज्ये कशी अडचणीत येतील, अशी मानसिकता केंद्र सरकारने ठेऊ नये, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला.

‘लाल वादळ’ राजभवानाच्या दिशेने, मोर्चेकऱ्यांना अडवलं; पोलिसांबरोबर आंदोलकांची झटापट

आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही कान उपटले आहेत. “महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली.

संबंधित बातम्या:

“नरेंद्र मोदीजी तुम्ही देश विकायला आला आहात”, अबू आझमींचं टीकास्त्र

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानी आहे काय?; शरद पवारांचा संतप्त सवाल

(Jayant Patil on farmers protest)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.