कोण आहेत यास्मिन वानखेडे ज्यांना नवाब मलिकांनी लेडी डॉन म्हटलंय? काय आहे त्यांची संपूर्ण प्रकरणात भूमिका?

नवाब मलिक यांनी आज लेडी डॉनचा उल्लेखही केला. या लेडी डॉनशी तुमचा संबंध काय? या लेडी डॉनचे बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे ही लेडी डॉन कोण आहे? असा सवाल केला जात आहे.

कोण आहेत यास्मिन वानखेडे ज्यांना नवाब मलिकांनी लेडी डॉन म्हटलंय? काय आहे त्यांची संपूर्ण प्रकरणात भूमिका?
YASMIN WANKHEDE


मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मलिक यांनी पंचाच्या मुद्द्यावरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच एका लेडी डॉनचा उल्लेखही केला. या लेडी डॉनशी तुमचा संबंध काय? या लेडी डॉनचे बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे ही लेडी डॉन कोण आहे? असा सवाल केला जात आहे.

मलिक नेमके काय म्हणाले?

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लेडी डॉनच्या मुद्दयावरून वानखेडेंना काही प्रश्न केले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.

लेडी डॉनची बॉलिवूडमध्ये दहशत?

तसेच पुढे बोलताना मलिक यांनी सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे. या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे यास्मिन वानखेडे आणि एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईंचा संबंध आहे का ? असा प्रश्न जनसामान्यांमधून विचारला जात आहे.

कोण आहेत यास्मिन वानखेडे?

मलिक यांनी ज्यांचा लेडी डॉन असा उल्लेख केला. त्यांचं नाव यास्मिन वानखेडे असं आहे. यास्मिन वानखेडे या समीर वानखेडे यांच्या बहीण आहेत. यास्मिन वकील आहेत. त्या मनसेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा असून मनसेचं कायदेशीर कामही पाहतात. तसेच त्या महिलांच्या विविध समस्या सोडवण्याचेही काम करतात, अशी माहिती यास्मिन वानखेडे यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

सिंगापूरचं स्वप्न दाखवत धुळ्याला खड्डापूर केलं, गिरीश महाजनांवर शिवसेनेची घणाघाती टीका

‘अर्धेच काय संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही’, मलिकांचं फडणवीसांना आव्हान

शरद पवार म्हणाले ठाकरेंचा हात सक्तीने वर केला, “साहेब ! किती हा भाबडेपणा” म्हणत फडणवीसांनी उडवली खि

(ncp leader nawab malik criticizes sameer wankhede alleged involvement of yasmin wankhede in ncp action know know about yasmin wankhede)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI