AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar on Baba Siddiqui Death : फक्त चौकशी नको, सत्ताधाऱ्यांनो पाय उतार व्हा, शरद पवार यांनी खडसावलं

अवघ्या 7 महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराने संपूर्ण राज्य हादरलं. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास निर्मलनगर येथे ही घटना घडली. सिद्दीकी यांच्यावर 3-4 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी ही त्यांच्या छातीला लागली.

Sharad Pawar on Baba Siddiqui Death :  फक्त चौकशी नको, सत्ताधाऱ्यांनो पाय उतार व्हा, शरद पवार यांनी खडसावलं
शरद पवार
| Updated on: Oct 13, 2024 | 12:04 AM
Share

अवघ्या 7 महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराने संपूर्ण राज्य हादरलं. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास निर्मलनगर येथे ही घटना घडली. सिद्दीकी यांच्यावर 3-4 गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी एक गोळी ही त्यांच्या छातीला लागली. लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. क्राईम ब्रांच मुंबईचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र या गोळीबारामुळे प्रचंड खळबळ माजली असून विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या हत्याकांडाबद्दल दु:ख व्यक्त करत सरकारला खडसावलं आहे. ‘ गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे’ अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चपराक लगावली आहे.

शरद पवार यांचं ट्विट काय ?

X या सोशल मीडिया साईटवरील अधिकृत अकाऊंटवरून शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. ‘ राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो’ असे लिहीत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांनी पायउतार होण्याची मागणी केली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्याचा अजित पवार यांंनी केला निषेध’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.

‘ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

‘  या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सुनेत्रा पवार यांनी वाहिली श्रद्धांजली 

तर अजित पवार यांची पत्नी, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनीही बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. ‘ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या धक्कादायक, दुर्दैवी व निषेधार्ह आहे. अल्पसंख्याक बांधवांचे नेतृत्व करणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आज हरपले. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते. या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन मी पोलिस प्रशासनाला करते. सिद्दीकी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. बाबा सिद्दीकी यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली..!’ असे सुनेत्रा पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केले. 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.