‘मला पदरात घ्या’; बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन? शरद पवारांना मोठा धक्का?

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या तुतारी पक्षाच्या चिन्हावर बीड लोकसभा मतदारसंघात जिंकून येणारे बजरंग बाप्पा सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

'मला पदरात घ्या'; बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन? शरद पवारांना मोठा धक्का?
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 4:39 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणडे बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या गळाला तर लागले नाही ना? अशा चर्चेला आता उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर जवळपास 10 मिनिटे चर्चा झाली आहे. तर शरद पवार गटातील आणखी काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबतच मोठा दावा केला आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. मला पदरात घ्या, असं सोनवणे अजित पवारांना म्हणाले असतील, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत प्रतिक्रिया दिली.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

“ट्वीटच्या माध्यमातून एक गोष्ट मला महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे, तळागाळातील, सोशितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, ऊसतोड कामगारांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी एकच नेता सक्षम आहे, तो नेता म्हणजे अजित पवार. त्यामुळे आज सकाळी बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन आला. तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता. पण तो फोन असाही असू शकतो की, बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्याकडे आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावं, अशी विनंती करत असावेत. शरद पवार गटात आपलं भविष्य उज्ज्वल नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल”, असा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर...
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर....
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?.
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद.
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण....
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण.....