Sharad Pawar | डॉक्टर म्हणाले, उरलेली कामं करून घ्या.. 6 महिनेच बाकी, पवारांनी डॉक्टरांनाच सुनावलं.. औरंगाबादेत सांगितला कँसरविरोधात लढ्याचा अनुभव

संकटांवर मात करण्यासाठी जिद्द आणि इच्छाशक्ती हवी हे सांगताना शरद पवार यांनी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील भूकंपाच्या वेळची आठवण सांगितली.

Sharad Pawar | डॉक्टर म्हणाले, उरलेली कामं करून घ्या.. 6 महिनेच बाकी, पवारांनी डॉक्टरांनाच सुनावलं.. औरंगाबादेत सांगितला कँसरविरोधात लढ्याचा अनुभव
महापालिकेसाठी राष्ट्रवादीने कंबर कसलीImage Credit source:
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:24 PM

औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राजकीय कारकीर्दीतल्या विविध अनुभवांच्या आठवणी सांगितल्या. आज सोमवारी त्यांनी शहरातील मराठवाडा कँसर हॉस्पिटलचं (Marathwada cancer hospital) उद्घाटन केलं. यावेळी भाषणातून स्वतः कँसरविरोधात कशाप्रकारे लढा दिला, याची कहाणी शरद पवारांनी सांगितली. संकटांवर मात करण्याची इच्छा शक्ती प्रबळ हवी, त्यानंतर कोणत्याही आव्हानांना तोंड देता येतं, असं यावेळी त्यांनी सांगितलं. मला कँसर (Cancer) झाला तेव्हा डॉक्टरांनी उरलेली कामं करून घ्या, तुमच्याकडे फक्त 6 महिने राहिलेत, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण मीच त्याला म्हटलं, तू निवांत बैस, मी काही जात नाही. लागल्यास तुला पोहोचवून जाईन. 2004 मध्ये कँसर झाला आज 2022 मध्ये मी आठवड्यातून चार दिवस बाहेर फिरतो, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं.

कँसर झाला तेव्हा…

शहरातील मराठवाडा कँसर हॉस्पिटलच्या उद्धाटन प्रसंगी बोलताना शरद पवारांनी सांगितलं, ‘ मी लोकसभेचा फॉर्म भरला मला महाराष्ट्र भर फिरावं लागायचं तेंव्हा डॉ. जलील भापकर माझ्यासोबत असायचे. त्यांनी मला सांगितलं तुमच्या चेहऱ्यावर सूज दिसतेय. आम्ही तपासण्या केल्या. डॉक्टरांनी सांगितले कॅन्सरची शक्यता आहे. मग मी न्यूयॉर्कला गेलो. त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. त्यांनी मला विचारलं तुम्ही इथे का आलात? तर मी म्हणालो, तुमची संस्था मोठी आहे म्हणून आलो.. तर ते डॉक्टर म्हणाले महाराष्ट्रात डॉ. प्रधान यांचा आम्ही सल्ला घेतो. मग मी पुन्हा परत महाराष्ट्रात आलो आणि ऑपरेशन केलं. त्यानंतर एक नवीन डॉक्टर मला म्हणाला, तुमची राहिलेली कामं करून घ्या. कारण तुम्ही सहा महिने राहणार आहेत, मी डॉक्टरला म्हणालो, तू निवांत बैस. मी काही जात नाही लागल्यास तुला पोचवून जाईन.. 2004 ला कॅन्सर झाला आज 2022 आहे मी आठवड्यातून चार दिवस बाहेर फिरतो..असं शरद पवारांनी सांगितलं.

इच्छाशक्ती मोठी हवी…

संकटांवर मात करण्यासाठी जिद्द आणि इच्छाशक्ती हवी हे सांगताना शरद पवार यांनी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील भूकंपाच्या वेळची आठवण सांगितली. ते म्हणाले, गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस होता आणि तो दिवस मुख्यमंत्र्यांसाठी काळजीचा दिवस होता, मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा परभणीत गणपती विसर्जनाला वेळ लागला त्यामुळे मी 4 वाजता झोपायला गेलो तेंव्हा माझ्या खोलीच्या खिडक्या वाजल्या मला जाणवलं भूकंप झाला कोयनेत विचारलं भूकंप नव्हता पण मला नंतर कळलं किल्लारीत भूकंप झाला मी तातडीने विमान घेतलं लातूरला उतरली आणि सकाळी 7 वाजता किल्लारीत पोचलो हजारो लोक मृत्युमुखी पडले होते, मी परत मुंबईला गेलो नाही तिथेच थांबलो आणि पुनर्वसन केलं आज तिथलं आम्ही पुनर्वसन केलेलं आहे, संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती मोठी होती,…

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.