AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकासआघाडीचा ईव्हीएमवर आक्षेप, शरद पवारांच्या निवासस्थानी नेत्यांची खलबत, निर्णय काय?

नवी दिल्लीत आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ईव्हीएमबद्दल चर्चा करण्यात येणार आहे.

महाविकासआघाडीचा ईव्हीएमवर आक्षेप, शरद पवारांच्या निवासस्थानी नेत्यांची खलबत, निर्णय काय?
ज्येष्ठ नेते शरद पवार
| Updated on: Dec 10, 2024 | 11:27 AM
Share

Sharad Pawar Delhi Meeting : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 2 आठवडे उलटले आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी लागली आहे. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे महाविकासआघाडीचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचा आरोप करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ईव्हीएमबद्दल चर्चा करण्यात येणार आहे.

विधानसभेत झालेल्या पराभवानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात आहे. अनेक नेत्यांनी ईव्हीएमला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. महाविकासाआघाडीकडून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेतली जावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज रात्री शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

महाविकासआघाडीतील नेते बैठकीला उपस्थितीत राहणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री शरद पवारांच्या घरी पुन्हा एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ईव्हीएम संदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. आज रात्री आठ वाजता ही बैठक होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीसाठी महाविकासआघाडीतील अनेक नेते उपस्थितीत राहणार आहेत.

“…..तर बॅलेटवर निवडणुका घ्या”

त्यातच आता नुकतंच महाविकासाआघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आज मी शरद पवार यांची भेट घेतली. मी काल मल्लिकार्जुन खरगे यांची देखील भेट घेतली. महाराष्ट्राचं राजकारण, आगामी दिशा यावर आमच्यात चर्चा झाली. संघटनात्मक बदलबाबत काही चर्चा झाली नाही. राज्यात सगळ्यांच्या मनात ईव्हीएमवर शंका, संशय आहे. भाजप एवढी पुढे कशी जाऊ शकते म्हणून चर्चा सुरू आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

अनेक गावं म्हणत आहेत की आम्हाला बॅलेटवर मतदान घ्यायचं आहे. सुप्रीम कोर्टात जायचं की नाही यावर अद्याप निर्णय झाला नाही. EVM वर शंका असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्यायला काय अडचण आहे, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

रात्री बैठकीनंतर पुढील दिशा ठरवू – उत्तम जानकर

तर दुसरीकडे शरद पवार पक्षातील आमदार उत्तम जानकर हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. आज आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. राज्यात संशयाचं वातावरण घोंगावत आहे. शरद पवार यांनी आमची मतं जाणून घेतली. लाखांचा फरक पडत असेल, तर मी माझा राजीनामा देतो. लगेचच निवडणुका घ्या, अशी माझी मागणी आहे. आज रात्री याबद्दल बैठक होईल. त्यानंतर पुढील दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया उत्तम जानकर यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मारकडवाडीत जावं.  लपवाछपवी करून काही होत नाही, आमच्या गावाचं मतं काय, कुठे गेले हे तेथील लोकांना समजलं पाहिजे. बाळासाहेब थोरात हे आधी राहुल गांधी यांच्याशी चर्चा  कतील. त्यानंतर ते या बैठकीत उपस्थितीत राहतील की नाही, याचा निर्णय घेणार आहेत.

सध्या या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते सचिन दोडके, प्रशांत जगताप शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत. अभिषेक मनू सिंघवी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आम्हाला कायदेशीर न्याय नक्की मिळेल. मतदार यादीतील घोळ , वाढलेली मते , ईव्हीएम बाबत आम्ही शरद पवार आणि सिंघवी यांच्याशी कायदेशीर चर्चा करणार आहोत, असं प्रशांत जगताप आणि सचिन दोडके यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.