चक्रीवादळ दूर होण्यासाठी पुढील 6 तास महत्वाचे, सर्वत्र पाऊस कोसळत राहणार : हवामान विभाग

ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पडणार आहे," अशी माहिती हवामान खात्याने (Cyclone Nisarga Update IMD) दिली.

चक्रीवादळ दूर होण्यासाठी पुढील 6 तास महत्वाचे, सर्वत्र पाऊस कोसळत राहणार : हवामान विभाग

मुंबई : “महाराष्ट्रावर आलेले निसर्ग चक्रीवादळाचे संकट पुढील 6 तासात दूर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता हळहळू कमी होईल. मात्र तरीही ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पडणार आहे,” अशी माहिती हवामान खात्याने (Cyclone Nisarga Update IMD) दिली.

“निसर्ग चक्रीवादळाचे संकट पुढच्या 6 तासात दूर होईल. हळूहळू वादळाची तीव्रता कमी होणार आहे. ताशी 23 किमी वेगाने वादळ पुणे, नाशिकच्या दिशेनं सरकत आहे. वाऱ्याचा वेग 100 किमी ते 110 किमी प्रति तास असणार आहे. यादरम्यान ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे,” अशी माहिती हवामान खात्याने दिली.

हेही वाचा Cyclone Nisarga | मुंबई-अलिबागमध्ये झाडं कोसळली, पुण्यात धावत्या कारवर झाड पडले, जीवितहानी नाही

महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. मात्र मुंबईवरचं संकट टळलं आहे. चक्रीवादळ रायगडमधून अलिबाग, पेण, पनवेल मार्गे ठाण्याच्या दिशेने नाशिककडे वळले.

रायगडमध्ये दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अलिबागमध्ये वादळ धडकल्यानंतर पुढे सरकून ते पेण, पनवेलच्या बाजूने सरकले. त्यापूर्वी  दुपारी 12.20 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

पाहा फोटो झाडांची पडझड, पत्रे उडाले, ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं रौद्र रुप

अलिबाग किनारपट्टीवर चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं. या वादळाने मोठ्या प्रमाणात वृक्ष भुईसपाट झाले. आंब्याचा तर सडाच झाला, त्याचबरोबर घरांचे पत्रे, वीज खांब कोलमडले. परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.

श्रीवर्धन, अलिबाग आणि मुरुडला जोरदार पाऊस असून काही इमारतीवरचे पत्रे उडाले. कोकणात अनेक ठिकाणी झाडे पडली. दिवे आगार किनारपट्टीवर जोरदार पावसासह वारे वाहत होते. यामध्ये मुरुड आणि श्रीवर्धनच्या तहसील कार्यालयाचं थोडं नुकसान (Cyclone Nisarga Update IMD) झालं.

संबंधित बातम्या :

Cyclone Nisarga | मुंबईवरचा धोका टळला, चक्रीवादळ पुढे सरकले : हवामान विभाग

Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ घोंघावलं, पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *