Thackrey Brother : मुंबई आकर मिलूंगा… निशिकांत दुबे यांचं राज-उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज, बीएमसी निकालानंतर थेट डिवचलं..
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीला अभूतपूर्व यश मिळताना दिसत असून भाजपने तर जोरदार मुसंडी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक सूचक पोस्ट केली आहे. त्याचीच सगळीकडे चर्चा आहे.

अख्ख्या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा (BMC Election) निकाल लागत असून भारतीय जनता पक्ष आणि शिवलेना शिंदे गटाच्या महायुतीने जोरदार मुसंडी मारत मुंबई महापालिकेवर भगवा फडकावण्याच ध्येय काबीज केल्याचं दिसत आहे. महापौरपदासाठी 114 ही मॅजिक फिगर असुन भाजप सेना युतीने 120 पेक्षा ही जास्त जागांवर आघाडी मिळवली असून शिवसेना ठाकरे गटाचे स्थान डळमळीत केलं आहे. तब्बल 25 वर्षानंतर शिवसेने मुंबई महापालिकेची सत्ता सोडावी लागणार असून आता भाजप-सेनेचे महापौर तिथे विराजमान होईल हे सूर्यप्रकाशाइतक स्वच्छ आहे.
मतमोजणी अद्याप सुरू असली तरी प्राथमिक कलांनुसार, भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून देवेद्र फडणवीस हेच मुंबईचे किंग असतील हे दिसत आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपचाच विजय होत असल्याचे चित्र दिसत असून य़ा अबूतपूर्व यशानंतर आता भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक खोचक ट्विट केलं आहे. त्यातून त्यांनी ठाकरे बंधूंना ( Raj Thackrey, Uddhav Thackrey) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Municipal Election 2026
Mumbai Municipal Election Results 2026 : माझ्या पोरानं ठाकरेंची इज्जत काढली, सोमय्या यांची थेट टिका...
Maharashtra Election Results 2026 : जळगाव महापालिकेत महायुतीचा दणदणती विजय...
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 48 मधून काँग्रेसचे उमेदवार रफिक इलियास शेख आघाडीवर
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत
हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला
मुंबईत येऊन उद्धव आणि राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे निशिकांत दुबे यांनी सांगितले. BMCमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभवावर टीका करताना निशिकांत दुबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सूचक पोस्ट केली. “मी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना भेटेन.” असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. एकप्रकारे त्यांनी ठाकरे बंधूंना डिवचण्याचाच प्रयत्न केला आहे.
मुम्बई आकर उद्धव ठाकरे जी तथा राज ठाकरे जी से मिलूँगा
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) January 16, 2026
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
खरं तर, गेल्या वर्षी जुलैमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटल्यानंतर लढाईत निशिकांत दुबे आणि राज ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध झाले होते.मीरारोडच्या सभेत मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल गैरउद्गगार काढणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. “दुबे, तुम मुंबई में आ जाव. मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे” असंही राज ठाकरे यांनी त्यांना सुनावलं होतं. त्यांच्या याच विधानाला दुबे यांनी आज खोचक प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे.
‘यूपी-बिहार आओगे तो पटक-पटक कर मारेंगे’
महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद शिगेला पोहोचलेला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेवरुन टीका केली होती. राज ठाकरे जर महाराष्ट्राबाहेर किंवा उत्तर भारतीय राज्यांमध्ये आले, तर त्यांना पटक-पटक कर मारेंगे, असंही दुबे हे म्हणाले होते. जर तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू किंवा दक्षिण भारतीय भाषा बोलणाऱ्यांना मारहाण करा. जर तुम्ही उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये आलात तर आम्ही तुम्हाला मारहाण करू.” अशी धमकीच त्यांनी दिली होती. त्याच्या या विधानावर राज ठाकरेंनीही त्यांना चांगलचं सुनावलं होतं. मैं दुबे को बोलता हूं, तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समंदर में डुबो-डुबोकर मारेंगे, असं चॅलेंजच राज ठाकरे यांनी दिलं होतं.
