AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याच्या मालमत्तेवर ईडीची टाच, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नितेश राणे यांची मागणी

आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालंही तसंच. कारण आता मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. यावर आता भाजप नेत्यांना टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते नितेश नितेश राणे यांनी केली आहेत.

Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याच्या मालमत्तेवर ईडीची टाच, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नितेश राणे यांची मागणी
nitesh raneImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 7:57 PM
Share

ठाणे : आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र (ED raid) सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालंही तसंच. कारण आता मुख्यमंत्र्यांच्या (Cm uddhav thackeray) मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर, असे मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याचं नाव आहे, (Shridhar patankar) ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात सध्या ईडी अॅक्टिव्ह मोडवर आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने हा मोठा दणका दिला आहे. यात ईडीने आधीही कोट्यवधी रुपयांची माहिती सोर आली आहे. यात ईडीने आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात अनेक मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत. यावर आता भाजप नेत्यांना टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते नितेश नितेश राणे यांनी केली आहेत.

 नितेश राणेंकडून राजीनाम्याची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर, असे मुख्यमंत्र्यांच्या महुण्याचं नाव आहे, ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी टीका करताना म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. यापूर्वी देखील नितेश राणे आणि कुटुंबियांनी अनेकदा ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारला केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह आमदार नितेश राणे आणि निलेश राणे कोणतीही संधी सोडत नाहीत. त्याचा पुन्हा एकदा प्रत्येय आला आहे. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईवरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ईडीने काय माहिती दिली?

यापूर्वी संचालनालयाने 06.03.2017 रोजी, PMLA, 2002 च्या तरतुदींनुसार, पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती आणि आधीच पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. 21.46 कोटी किंमतीच्या महेश पटेल, चंद्रकांत पटेल, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित कंपन्या आहेत. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने पुष्पक ग्रुपच्या मेसर्स पुष्पक रियल्टीचा निधी चोरून नेला होता. मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली 20.02 कोटी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना विविध जोडलेल्या/अनकनेक्ट केलेल्या संस्थांद्वारे चोरल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय.  अनेक शेल कंपन्या चालवणारे नंदकिशोर चतुर्वेदी यांनी त्यांच्या शेल कंपनी मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत जास्त असुरक्षित कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे हस्तांतरित केले. मेसर्स श्री साईबाबा गृहनिर्मिरी प्रा.ला 30 कोटी महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने काढून घेतलेले, असेही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या

तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, ED च्या कारवाईनंतर आव्हाडांचा BJP ला इशारा

Rashmi Thackeray Brother: कुणी कुणाचा पैसा कसा वळवला? रश्मी ठाकरेंच्या भावाची EDनं सांगितलेली Modus Operandi

TV9 Marathi Poll : आरोग्य जागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर केला तर खरंच चुकलं? जाणून घ्या जनतेचं मत

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...