Nitesh Rane: नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

भाजप नेते नितेश राणे यांना आजही दिलासा मिळाला नाही. नितेश राणे (nitesh rane) यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (police Custody) देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nitesh Rane: नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा
नितेश राणे
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 4:57 PM

सिंधुदुर्ग: भाजप नेते नितेश राणे यांना आजही दिलासा मिळाला नाही. नितेश राणे (nitesh rane) यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (police Custody) देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे हे जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. त्यामुळे सत्र न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नितेश यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज सिंधुदुर्ग न्यायालयात (Sindhudurg Court) हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात कोठडीवर सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी नितेश यांची कसून चौकशी केली. तपासाचा भाग म्हणून पोलीस त्यांना गोव्यातही घेऊन गेले होते. तसेच राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली. यात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्वाचे धागेदोरे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितेश राणे यांना आज दुपारी सिंधुदुर्ग कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद झाला. यावेळी पोलिसांनी नितेश राणे यांची 8 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाला का याचा तपास करायचा आहे. नितेश यांना पुण्याला न्यायचं असून अजून काही गोष्टींचा तपास करायचा आहे, त्यामुळे नितेश यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी केली. तर नितेश राणे यांना आधीच दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला.

तपासाला भरपूर वेळ मिळाला

आजपर्यंत त्यांना भरपूर वेळ मिळाला आहे. नितेश राणे साहेब चार वेळा त्यांच्यासमोर अपील झाले आहेत. बाकी जे काही पुरावे त्यांना घ्यायचे आहेत ते कलेक्ट केले आहेत. त्यात मोबाईल, कागदपत्रांचा समावेश होता. हे सगळं साहेबांनी ऐकल्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली, असं सतीश माने-शिंदे म्हणाले. पोलिसांना पुण्यात जाऊन तपास करायचा आहे, तसंच काही आर्थिक बाबींचा तपास करायचा आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पण त्याबाबत कुठलाही पुरावा ते देऊ शकले नाहीत, असंही माने-शिंदे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या: 

Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणेंवर अटकेची तलवार? सिंधुदुर्ग न्यायालयात दोन्ही बाजूने वकिलांची फौज, नेमकं काय घडणार?

संतोष परब हल्ला ते नितेश राणेंची पोलीस कोठडी; महिनाभरात सिंधुदुर्गच्या राजकारणात नेमकं काय काय घडलं? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.