AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर..’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केली होती, आता या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर..', उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 6:44 PM
Share

गुरुवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला, या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काही जणांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो, त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप मिळणारच’ हिंदुत्वासाठी कोणी काम करत असेल तर ते बाळासाहेबांच्या मुलाला खटकणारच, म्हणूनच तर त्यांनी बाळासाहेब यांचा विचार सोडला असं आम्ही बोलतो, असं राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राणे? 

काही जणांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो, त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप मिळणारच’ हिंदुत्वासाठी कोणी काम करत असेल तर ते बाळासाहेबांच्या मुलाला खटकणारच, म्हणूनच तर त्यांनी बाळासाहेब यांचा विचार सोडला असं आम्ही बोलतो.  स्वतःचा मुलगा कसा आहे, हे त्यांना माहिती आहे.  त्यामुळे मला पेंग्विन बोलून फरक पडत नाही.  स्वतःच्या मुलाची अवस्था बघा,  दिनो आणि दिशा बद्दल माहिती देत आहोत आम्ही, म्हणून टीका केली जाते.  स्वतःच्या मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर हे टाळता आलं असतं, असा घणाघात राणे यांनी केला  आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या बापाचं नाव लावायची लाज वाटायची. राहुल गांधी स्टेजवर असताना हिंदू हृदयसम्राट बोलण्याची हिंमत तरी करा, शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे   राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. हम दो हमारे दो एवढंच तुम्ही केलं, आम्ही विकास करतोय असं राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीसंदर्भात सूरू असलेल्या चर्चेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या हितासाठी ते भांडले नव्हते, त्यांचे कौटुंबीक भांडणं होती. लग्नामध्ये एकत्र येतात, तुम्हाला विचारून एकत्र येतात का? एकाकडे शून्य आमदार आणि एकीकडे 20 आमदार काय होणार? असा खोचक टोला यावेळी नितेश राणे यांनी लगावला आहे.

Follow Us
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....