मस्ती आली काय?… महाविकास आघाडीच्या कथित फेक नरेटीव्हवर महायुतीचं रॅपने उत्तर; Video व्हायरल
Nitesh Rane Tweet Rap Song For Mahavikas Aghdi : भाजपचे नेते नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. रॅप साँगच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे. ट्विटमध्ये काय? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. भाजपने 400 पारचा नारा दिलेला असताना महाराष्ट्रात मात्र त्यांनी अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून महविकास आघाडीवर टीका केली गेली. महाविकास आघाडीकडून सरकारच्या विरोधात संविधान बदलणार असल्याचा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. त्यामुळे काही जागांवर त्यांना यश मिळालं, असा आरोप महायुतीकडून केला गेला. आता महायुतीकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यात आला. रॅप साँगच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत हे रॅप साँग शेअर केलंय.
महायुतीचं रॅपमधून महाविकास आघाडीला उत्तर
महाविकास आघाडीच्या कथित फेक नरेटीव्हवर महायुतीने रॅपने उत्तर दिलं आहे. राज्यातल्या विविध मुद्द्यांवर बोलत महायुतीकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात आली आहे. खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय? हा रॅप सध्या व्हायरल होत आहे. एकदम कडक म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी हे रॅप ट्विट केलं आहे. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रॅपमध्ये नेमकं काय?
खोटं बोलून मतं मिळाली, मस्ती आली काय? महाराष्ट्राची जनता आता जागी झाली हाय… 500 मधून 100 जागा आल्या म्हणून पास होत नाय. 10-20 जागा वाढल्या म्हणून सत्ता येत नाय… अशा शब्दात टीका रॅपच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे. या व्हीडिओमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार रोहित पवार यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. महायुतीवर टीका करण्यात आली आहे.
एकदम कडक 👇😅 pic.twitter.com/KmjxA8FdUa
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 8, 2024
भाजप- महायुती सरकार जर बहुमताने सत्तेत आलं तर हे देशाचं संविधान बदलतील, असा आरोप महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीआधी करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रात परिर्तन झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचे 31 उमेदवार निवडून आले तर महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर महाविकास आघाडीने फेक नेरेटिव्ह तयार केला असल्याचाआरोप महायुतीने केला.
