AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरी यांना भाषण करताना भोवळ, यवतमाळच्या पुसद सभेतील घटना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळच्या पुसद येथील सभेत भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. भोवळ आल्यानंतर त्यांना काही वेळ सभास्थळी मागच्या ग्रीन रुममध्ये बसवण्यात आलं.

नितीन गडकरी यांना भाषण करताना भोवळ, यवतमाळच्या पुसद सभेतील घटना
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 24, 2024 | 4:40 PM
Share

राज्यासह देशभरात प्रचंड उन्हाचा कडाका बघायला मिळतोय. एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांना मोठी झळ बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याचाी घटना घडली होती. त्यानंतर आज यवतमाळच्या पुसद येथे अशीच एक घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुसदमध्ये भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पण संबंधित घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना उन्हामुळे भोवळ आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आजही त्यांना भर मंचावर भाषण करत असताना भोवळ आली आहे. नितीन गडकरी यांना भोवळ आल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरलं. अन्यथा ते जमिनीवर कोसळले असते.

नेमकं काय घडलं?

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज यवतमाळच्या पुसद येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या आयोजनानुसार नितीन गडकरी भाषणासाठी आले. ते भाषण देत असताना अचानक त्यांना भोवळ आली. यावेळी मोठी तारांबळ उडाली. नितीन गडकरी यांच्या अंगरक्षकांनी त्यांना पकडलं. तर इतरांनी तातडीने त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर नितीन गडकरी यांना खुर्चीवर बसवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर सभास्थळी ग्रीन रुममध्ये त्यांना बसवण्यात आलं आहे. त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

गडकरी पुन्हा भाषणाला आले

नितीन गडकरी यांना भाषण करत असताना अचानक भोवळ आल्यामुळे मंचावर असलेले पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचा काळजाचा ठोका चुकला होता. पण नितीन गडकरी आता त्यातून सावरले आहेत. त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी थोडासा आराम केल्यानंतर ते पुन्हा भाषणासाठी व्यासपीठावर आले. त्यांनी जोरदार भाषण केलं. त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन यवतमाळच्या नागरिकांना केलं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल