Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकमधून सर्वात मोठी बातमी, मोठा उलटफेर, भाजपला मोठा धक्का
Nashik Municipal Corporation NMC Ward 25 and 26 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 25 आणि 26 वर भाजपसह मनसे आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 चा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. यानुसार 15 जानेवारीला मतदान पार पडले. त्यानंतर आज 16 जानेवारीला निकाल जाहीर होत आहेत. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात.
सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का
भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे. स्वतःच्या घरात भाजपचे 4 तिकीट घेणाऱ्या बडगुजर यांना मोठा धक्का बसले आहे. प्रभाग 25 चा निकाल समोर आला आहे. 4 पैकी 2 जागांवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी झाल्या आहेत. तर इतर 2 जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी झाले आहेत. भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर पराभूत झाले आहेत.
Municipal Election 2026
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : भाजपात घडामोडींना वेग, कार्यकर्ते थेट भाजप कार्यालयात, मुंबईत...
Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका...
Mumbai Election Ward No 105, 217, 39,168 Result Live 2026 : वॉर्ड क्रमांक 105, 217, 39,168 चा निकाल काय?
Mumbai Election Results Live 2026 : मुंबईत कुठल्या पक्षाकडे किती जागांची आघाडी?
अजितदादाच्या राष्ट्रवादीचा मतमोजणीवर बहिष्कार; रुपाली पाटील ठोंबरे यांचा भाजवर गंभीर आरोप
सांगलीचा महानिकाल, भाजच्या हातीच महापालिका
प्रभाग क्रमांक 25
प्रभाग क्रमांक 25 हा प्रामुख्याने सिडको आणि कामटवाडे परिसराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या प्रभागात रायगड चौक, पाटील नगर, सावता नगर, उंटवाडी गावठाण आणि त्रिमुर्ती चौक यांसारख्या प्रमुख रहिवासी क्षेत्रांचा समावेश होतो. या भागाची अंदाजित लोकसंख्या 38000 ते 42000 च्या दरम्यान असून, येथे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाची मोठी वस्ती आहे. या प्रभागातील मुख्य समस्यांचा विचार करता, अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित काँक्रिटीकरण, पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी आणि त्रिमुर्ती चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी हे मोठे प्रश्न आहेत. तसेच, जुन्या सिडको वसाहतींमधील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती आणि उद्यानांचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिक वारंवार करत असतात. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून सुधाकर बडगुजर (शिवसेना) हर्षा बडगुजर (शिवसेना) भाग्यश्री ढोमसे (भाजप) श्यामकुमार साबळे (शिवसेना) यांनी विजय मिळवला होता.
प्रभाग क्रमांक 26
प्रभाग क्रमांक 26 हा अंबड लिंक रोड आणि पवन नगर परिसराभोवती केंद्रित असून तो औद्योगिक क्षेत्राला लागून आहे. या प्रभागात खुटवड नगर, डी.जी.पी. नगरचा काही भाग आणि सिडकोच्या सेक्टरमधील दाट लोकवस्तीचा समावेश होतो. येथील लोकसंख्या साधारण 40000 ते 44000 च्या आसपास आहे. या प्रभागाची सर्वात मोठी समस्या म्हणजे अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असल्यामुळे होणारे प्रदूषण आणि अवजड वाहनांची वर्दळ, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त, अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते आणि काही भागांत होणारा विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीच्या वेळा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यांकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून दिलीप दत्तू दातीर (शिवसेना) हर्षदा संदीप गायकर (शिवसेना), अलका कैलास अहिरे (भाजप), भागवत पाराजी आरोटे (शिवसेना) या उमेदवारांनी विजय मिळवला होता.
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
