राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ

शिवसेना नेते भोलानाथ ठाकूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Bholanath Thakur suicide)

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ
भोलानाथ ठाकूर
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 9:31 PM

नवी मुंबई : माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते भोलानाथ ठाकूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भोलानाथ ठाकूर यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे नवी मुंबईसह दिघा विभागात एकच खळबळ उडाली आहे. (NMC former corporator Bholanath Thakur commit suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलानाथ ठाकूर हे ठाण्यातील दिघा आनंद निवास या ठिकाणी राहतात. काल रात्री भोलानाथ ठाकूर त्यांच्या राहत्या घरी परतले. त्यानंतर ते त्यांच्या रुममध्ये झोपण्यासाठी गेले. भोलानाथ ठाकूर हे दररोज सकाळी 11.30 ते 12 च्या दरम्यान उठतात. मात्र आज ते सकाळी त्यांच्या रुममधून बाहेर न आल्याने घरातील सदस्यांनी त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला.

पण त्यांनी आतून काहीही आवाज दिला नाही. त्यानंतर शेवटी त्यांच्या रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी भोलानाथ ठाकूर यांनी गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांच्या कुटुंबियानी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान सध्या पोलीस या प्रकरणाची अजून चौकशी करत आहेत. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली? याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण नवी मुंबईकरांना धक्का बसला आहे. तसेच यामुळे दिघा विभागात शोककळा पसरली आहे. सध्या कळवा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

भोलानाथ ठाकूर कोण? 

  • भोलानाथ ठाकूर नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 1 चे माजी नगरसेवक होते.
  • भोलानाथ ठाकूर हे दिघ्यामधील आनंदनगर येथे वास्तव्यास होते.
  • नाईक समर्थक गणले जाणारे भोलानाथ ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती.
  • त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.
  • ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.  (NMC former corporator Bholanath Thakur commit suicide)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईतील 57 नगरसेवकांचं भाजप प्रवेशावर एकमत, गणेश नाईकांच्या निर्णयाची प्रतीक्षा

शरद पवारांचंही काँग्रेससोबत भांडण, पण ते लाल दिवा किंवा निवडून येणार नाही म्हणून नाही : सुप्रिया सुळे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.