Sanjay Raut : शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपतींचा अपमान करू नका; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Sanjay Raut : श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी भेट झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. पाचवी जागा, सहावी जागा विषय नाही. शुभेच्छा आणि आशीर्वाद एवढीच ही भेट मर्यादीत होती. श्रीमंत शाहू महाराज हे शाहूंचे वारसदार आहेत.

Sanjay Raut : शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपतींचा अपमान करू नका; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपतींचा अपमान करू नका; राऊतांचा फडणवीसांवर पलटवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 1:23 PM

कोल्हापूर: काही सडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट लिहून अपुरी माहिती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पुरवली. यातून संभाजीराजे (sambhaji chhatrapati) आणि शाहू महाराज यांच्यात अंतर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपाचा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी समाचार घेतला आहे. शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते. छत्रपतींचा अपमान करू नका असा. चुकीच्या माहितीवर शाहू महाराज बोलणार नाहीत. फार ज्येष्ठ आहे ते. ज्या घराण्याचा वारसा ते घेऊन जात आहेत. तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केली जात नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत फडणवीसांवर पलटवार केला.

श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी भेट झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. पाचवी जागा, सहावी जागा विषय नाही. शुभेच्छा आणि आशीर्वाद एवढीच ही भेट मर्यादीत होती. श्रीमंत शाहू महाराज हे शाहूंचे वारसदार आहेत. शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही कामं करतो. कोल्हापुरात आहे, भेटायचंच होतं. मुख्यमंत्र्यांचाही मला निरोप होता, महाराजांना भेटा, त्यांचे आशीर्वाद घ्या. उद्धव ठाकरेंनीही श्रीमंत शाहू महाराजांशी फोनवरून प्रदीर्घ चर्चा केली. त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटायला येतो म्हणून सांगितलं, असं राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तो विषय संपलाय

श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतल्यानंतर संभाजी छत्रपती यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत पुन्हा विचार होणार आहे का? असा सवाल राऊत यांना पत्रकारांनी केला. त्यावर तो विषय संपलेला आहे, असं सांगत या विषयावर अधिक बोलणं राऊत यांनी टाळलं.

राजकीय उडी फसली

दरम्यान, राऊत यांनी सकाळीच शाहू महाराजांना भेटण्यापूर्वी विरोधकांवर टीका केली होती. संभाजी छत्रपती यांना पुढे करून राजकीय उडी मारण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण त्यांची ही उडी फसली आहे. त्यात काही दम राहिला नाही, अशी टीका राऊत यांनी केली होती. दोन जागा शिवसेनेच्या आहेत. तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर शिवसेनेत या असं आम्ही संभाजीराजेंना सांगितलं होतं, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.