प्रकाश शेंडगेंकडून ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, सकल ओबीसी महामेळाव्यातील नेत्याचा आरोप

प्रकाश शेंडगेंकडून ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, सकल ओबीसी महामेळाव्यातील नेत्याचा आरोप
प्रकाश शेंडगे

सांगलीत होणारा ओबीसी समाजाचा महामेळावा हा 25 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आला आहे. (Arun Kharmate allegation on Prakash Shendage)

Namrata Patil

|

Feb 11, 2021 | 12:01 AM

सांगली : “येत्या फेब्रुवारीत सांगलीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्यातील नेत्यात फूट पडली आहे. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे हे ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप सकल ओबीसी महामेळाव्याचे समनव्यक अरुण खरमाटे यांनी केला आहे. (OBC Leader Arun Kharmate allegation on Prakash Shendage)

“सांगलीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या नेत्यात पडली फूट आहे. ओबीसी समाज्याचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्यावर ओबीसी समाजातील अन्य नेत्यांनी आरोप केले आहेत. प्रकाश अण्णा शेंडगे हे ओबीसी समाजात फूट पाडण्याच्या हेतूने स्वत:चं लाँचिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही भूमिका हिताची नाही. याच हेतूने त्यांनी ओबीसी मेळाव्याची 27 फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली आहे,” असेही अरुण खरमाटे म्हणाले.

“प्रकाश शेंडगेंकडून जाणीवपूर्वक ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्री विजय वड्डेटीवार यांनी ओबीसी मेळाव्याच्या तारीख जाहीर केली आहे. पण प्रकाश अण्णा शेंडगे हे वेगळी तारीख जाहीर करत आहे.”

“सांगलीत होणारा ओबीसी समाजाचा महामेळावा हा 25  फेब्रुवारीला निश्चित करण्यात आला आहे. तरीही प्रकाश शेंडगे हे ओबीसी महामेळावा 27 फेब्रुवारीला आहे, असे सांगत आहे,” असा आरोप सकल ओबीसी महावेळाव्याचे समनव्यक अरुण खरमाटे यांनी केला.

सांगलीत ओबीसी समाजाचा मेळावा

ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे सरंक्षण करण्यासाठी सांगलीत ओबीसी समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीत सांगलीत स्टेशन चौक येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी छगन भुजबळ आणि कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह ओबीसी समाजाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात 1 ते 2 लाख लोक उपस्थित राहतील, अशी माहिती प्रकाश अण्णा शेंडगेंनी दिली होती.

मात्र यामुळे ओबीसी मेळावा समितीत दोन गट पडले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सकल ओबीसी महावेळाव्याचे समनव्यक अरुण खरमाटे यांनी ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगेंवर असंख्य आरोप केले आहेत.  (OBC Leader Arun Kharmate allegation on Prakash Shendage)

संबंधित बातम्या : 

लवकरात लवकर नोकरभरती करा, अन्यथा मंत्र्यांना घेराव घालू : प्रकाश शेंडगे

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या; राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें