लवकरात लवकर नोकरभरती करा, अन्यथा मंत्र्यांना घेराव घालू : प्रकाश शेंडगे

राज्यात लवकरात लवकर नोकरभरती करण्याची मागणी ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. (Prakash Shendge recruitment process)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:45 PM, 22 Jan 2021
लवकरात लवकर नोकरभरती करा, अन्यथा मंत्र्यांना घेराव घालू : प्रकाश शेंडगे
Prakash Shendge

मुंबई : राज्य सरकारकडून राबवली जाणारी नोकरभरती पुढे ढकलावी अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केल्यानंतर आता राज्यात लवकरात लवकर नोकरभरती करण्याची मागणी ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केली आहे. वेळीच नोकरभरती केली नाही तर ओबीसी, भटाके विमुक्त, मागासवर्गीय संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिलाय. (Prakash Shendge demands to start the recruitment process)

“मराठा आरक्षणामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या भरत्या मागील 2 वर्षांपासून थांबवलेल्या आहेत. मराठा समाजाच्या 13 टक्के जागांसाठी बाकीच्या 87 टक्के जागांना वेठीस धरलं जात आहे. राज्यातील काही मंत्र्यांनी नोकरभरती जाहीर केली आहे. मात्र या मंत्र्यांकडून तसे परिपत्रक जाहीर केले जात नाहीये, हे सगळं चुकीचं आहे,” असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

विनायक मेटे यांचा निषेध

यावेळी बोलताना मेटे यांच्या नोकरभरती थांबवण्याच्या भूमिकेवर प्रकाश शेंडगे यांनी टीका केली. तसेच, मेटे यांनी मराठा समाजाची नोकरभरती थांबवावी पण इतर समाजाची नोकरभरती न थांबवण्याची विनंतीही शेंडगे यांनी मेटे यांना केली. “राज्यातील जे मंत्री नोकरभरत्या जाहीर करतील, त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मेटे यांनी दिला आहे. अशा प्रकारच्या धमक्यांचा आम्ही निषेध करतो आहेत. फक्त मराठा समाजाची नोकरभरती थांबवायची असेल तर थांबवावी पण पूर्ण नोकरभरती थांबवणे चुकीचं आहे,” असं शेंडगे म्हणाले.

तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन

राज्य सरकारने लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू केली नाही तर मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी प्रकाश शेंडगे यांनी दिला. कोणतेही मंत्री भरती जाहीर करुन ती रद्द करत असतील तर त्यांना ओबीसी, भटके विमुक्त, मागासवर्गीय संघटना घेराव घातल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या 24 तारखेला जालना शहरामध्ये मोठा मोर्चा आयोजित केला आहे,” असे त्यांनी सांगितले. एवढं सारं करुनही सरकारने ऐकलं नाही तर महाराष्ट्रभर उग्र आदोलन करण्याचा इशाराही सेंडगे यांनी दिलाय.

नोकरभरती पुढे ढकला

विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती पुढे ढकलण्याची मागणी  22 जानेवारी रोजी केली होती. तसेच कोर्टात अर्ज सादर करणाऱ्या एमपीएससीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. एमपीएससीचा भरती विरोधातील अर्ज ही जातीयवादी भूमिकाच आहे. मराठा समाजात सरकारच्या धोरणांवर असंतोष आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

सरकार गोट्या खेळतंय का?; मराठा आरक्षणावरून मेटेंचा संतप्त सवाल

सरकारला अंधारात ठेवून MPSC ची न्यायालयात याचिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भडकले

एमपीएससीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकारच नाही; मराठा आरक्षणाचा वाद चिघळणार?

(Prakash Shendge demands to start the recruitment process)