AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध नाहीच, बड्या नेत्याची उमेदवार देण्याची घोषणा

Baramati By Election : बारामती विधानसभेची पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना एका बड्या नेत्याने बारामतीत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असं या नेत्याने म्हटलं आहे.

बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध नाहीच, बड्या नेत्याची उमेदवार देण्याची घोषणा
Baramati Election HakeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 31, 2026 | 4:40 PM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोट निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती विधानसभेची पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लक्ष्मण हाके उमेदवार देणार

बारामती विधानसभा पोट निवडणुकीबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, आम्ही बारामती विधानसभा पोट निवडणूक लढणार आहोत. यासाठी योग्य वेळी उमेदवार जाहीर करणार आहोत. अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. यामध्ये काही राष्ट्रीय पक्ष सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक पक्षांशी चर्चा सुरू आहेत. काहीही झालं तरी बारामतीची निवडणूक लढणार आहोत.

याआधीही पोट निवडणुका झाल्या आहेत

पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘महाराष्ट्रात याआधी अनेक वेळा एखाद्या नेत्याच निधन झालं तर त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत. रमेश वांजळे यांचे निधन झाल्यानंतर पोट निवडणुकीत भाजपाने त्या ठिकाणी उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली आहे. पिंपरी चिंचवडचे नेते लक्ष्मण जगताप यांचा अकाली निधन झाल्यानंतर. त्या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांच्या उमेदवाराच्या विरोधात अजित पवार यांनी उमेदवार उभा केला होता. त्यामुळे लोकशाही टिकायची असेल तर निवडणुका व्हाव्या लागतात. अशा प्रसंगाचे कारण सांगून निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.’

आम्ही दोन दिवसात उमेकवार जाहीर करणार

पुढे बोलताना हाके म्हणाले की, ‘आरक्षणाचा मुडदा पाडला जात असताना, आम्ही रस्त्यावर भांडणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरे जाऊ. शेवटी जनता ठरवेल. आमची मतं योग्य की अयोग्य. आमची निवडणूक योग्य की अयोग्य. येत्या दोन दिवसात उमेदवार कोण असेल हे आम्ही जाहीर करू. आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत. बारामतीची निवडणूक ताकतीने लढवणार आहोत.’

सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर पाठवा – हाके

लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले की, ‘दादांच्या सहानुभूतीवर सुनेत्रा पवारांना तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद दिले आहे. हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या पार्थ पवार यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवले आहे. शरद पवार यांनाही बिनविरोध राज्यसभेवर पाठवलेल आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर घेण्यात यावं आणि भाजपा सत्ताधाऱ्यांनी त्यांचा एक कार्यकर्ता निवडणुकीला उभा करावा. आप, बसपा, काँग्रेस, सत्तेमधील पक्ष आहेत. डायरेक्ट इन डायरेक्ट ते आमच्याशी सहमत आहेत. बारामतीत ओबीसींनी मनावर घेतलं तर पुढच्या पार्टीचे डिपॉझिट जप्त होऊ शकते.’

Follow Us
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी