टगे ओबीसींचं आरक्षण घेतील, मनोज जरांगे लबाड कोल्हा; लक्ष्मण हाके बरसले
नुकताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये. यासोबतच त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना देखील इशारा दिलाय. तुमचं ओबीसी आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार असल्याच त्यांनी म्हटले.

नुकताच लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये. ओबीसी बांधवांना विनंती आहे तुमचं ओबीसी आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार आहेत. कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीमध्ये प्रवेश करणाऱ्यांना लक्ष्मण हाके यांनी “टगे ” हा शब्द वापरला. मराठ्यांच्या नेत्यांना हाके यांनी टगे शब्द वापरल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका
लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, जरांगे हा लबाड कोल्हा आहे, त्यामुळे ओबीसीच्या लोकांनी ताट मानेने पुढे आले पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढत आहोत जरांगेने किती माणसं गोळा करायची काय करायचे ते त्याने करावे ओबीसी हे शांतपणे पहात आहेत. ओबीसीच्या तरुणांना आणि सगळ्या लोकांना हे समजत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना माझं सांगणं आहे, ओबीसी शांत आहे ओबीसीचा आवाज दिसत नाही असं तुम्ही समजू नका.
शरद पवार यांच्यावरही साधला थेट निशाणा
डोगल्या आणि डुप्लिकेट मंडल यात्रा काढण्याच्या भानगडीत शरद पवार यांनी पडू नये आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ओबीसीच्या स्टेजवर जाऊन मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा ओबीसींचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत. नाही तर आम्ही सत्ताधारी आणि विरोधकांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवणार आहोत. गावागावात आता सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढल्याने आता ओबीसीचं आरक्षण संपलं आहे.
ओबीसी आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार
त्यामुळे ओबीसी बांधवांना विनंती आहे, तुमचं ओबीसी आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार आहेत. फुले शाहू आंबेडकरांनी या सामाजिक न्यायासाठी गाव गळ्यातल्या प्रत्येक माणसाला मान सन्मान इज्जत मिळण्यासाठी जे आरक्षण दिलं ते आरक्षण संपवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक घाट घालत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. शरद पवारांनी केलेल्या काळी कृत्याची उपरती म्हणून ही मंडल यात्रा नागपूरमध्ये जाऊन काढली असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.
