AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आंदोलनाचा लढा पेटणार, आता थेट मनोज जरांगे पाटील यांच्या अतंरवालीतच ओबीसी नेत्याचं उपोषण, तगडा पोलीस बंदोबस्त

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, आज त्यांच्या उपोषणाचा 9 वा दिवस आहे, मात्र आता ओबीसी नेत्याकडून देखील उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

मोठी बातमी! आंदोलनाचा लढा पेटणार, आता थेट मनोज जरांगे पाटील यांच्या अतंरवालीतच ओबीसी नेत्याचं उपोषण, तगडा पोलीस बंदोबस्त
manoj jarangeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 3:11 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 9  वा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यभरात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मात्र अजूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघू शकलेला नाहीये, सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, सरकारला तुमच्या सर्व अटी मान्य असल्याचं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना म्हटलं होतं, तसेच तुम्ही उपोषण सोडावं अशी विनंती देखील त्यांना केली होती. मात्र आधी हैदराबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करा, नंतर उपोषणाचं बघू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.

मात्र आता अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 9 दिवसापासून निर्णायक आमरण उपोषण सुरू आहे, अशातच दुसरीकडे अचानक ओबीसी आंदोलक मंगेश ससाने हे देखील आता उपोषणाला बसले आहेत,  मंगेश ससाने यांनी आपलं लाक्षणिक उपोषण सुरू केलं असल्याने या उपोषण स्थळावर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.  एकाच गावात 2 उपोषण सुरु झाल्याने जालना जिल्ह्यात आंदोलनाचं वातावरण आणखी तापताना पाहायला मिळतंय. काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी देखील खबरदारी घेतली आहे, दरम्यान आता काहीही झालं तरी या ठिकाणावरून आम्ही उठणार नाही असा आक्रमक पवित्रा मंगेश ससाने यांनी घेतला आहे.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आता मंगेश ससाणे यांनी देखील उपोषण सुरू केल्यामुळे सर्व राज्याचं लक्ष आता अंतरवाली सराटीकडे लागलं आहे. ओबीसी समाजाने देखील आता आक्रमक भूमिता घेतली आहे.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी